मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी शपथ घेतली.
शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल.
सरकारकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती मी पूर्ण जबाबदारीने पार पाडणार आहे.”
भुजबळांची पहिली प्रतिक्रिया ठाम आणि सकारात्मक
भुजबळ म्हणाले, “1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. गृहखात्यापासून ते अन्न व नागरी
पुरवठा विभागापर्यंत अनेक खात्यांचा कारभार पाहिलाय. त्यामुळे आता कोणतेही खाते मी समर्थपणे हाताळू शकतो.”
“शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं!” असा उल्लेख करत त्यांनी आपले पुनःमंत्रिमंडळात स्वागत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नाराजांच्या प्रतिक्रियांवरही दिले मिश्किल उत्तर
भुजबळांच्या शपथविधीनंतर काही राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यावर पत्रकारांनी विचारले असता भुजबळ म्हणाले, “त्यांचे मी आभार मानतो,” असे मिश्किलपणे उत्तर देत ते पुढे निघाले.
राजकीय वर्तुळात भुजबळांना अनुभव संपन्न आणि कार्यक्षम नेता म्हणून ओळखले जाते.
आता त्यांना कोणते खाते मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Read Also : https://ajinkyabharat.com/krishi-assistant-odi-close-movement/