छावामधून डिलीट केलेला लेझीम डान्स पुन्हा दिसणार ? मोठ्या पडद्यावर रिलीज होणार गाणं ?

छावामधून डिलीट केलेला लेझीम डान्स पुन्हा दिसणार ? मोठ्या पडद्यावर रिलीज होणार गाणं ?

“छावा” या चित्रपटात विकी कौशलची प्रमुख भूमिका आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका गाण्यामध्ये लेझीम डान्सचे दृश्य होते,

मात्र त्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसताच तो सीनच चित्रपटातून काढून टाकण्यात आला.

मात्र आता याच गाण्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

Related News

काय आहे अपडेट ? चला जाणून घेऊया.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरातही सर्वांना वेड लावणारा ‘छावा’ आता तेलगु भाषेतही रिलीज होणार आहे.

या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी बॉक्स ऑफीसवरील सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.

मात्र याच चित्रपटातील एका दृश्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम नृत्याचा एक सीन होता.

पण त्यावरून बराच वाद निर्माण झाल्यानंतर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सल्ल्यानंतर दिग्दर्शकांनी तो सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

पण आता याच लेझीम सीनबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

‘छावा’ के तेलुगू ट्रेलर मध्ये लेझीम डान्स दाखवण्यात आला आहे.

त्यामुळे तेलगु व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना तो डान्स पहायला मिळू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

हे कितपत खरं आहे, जाणून घेऊया.

लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या टीमने ‘लेझिम डान्स’बाबत महाराष्ट्रात होत असलेला विरोध पाहता चित्रपटातून
हा सीन हटवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तेलगु भाषेत डब करण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये
त्या गाण्यात बदल करण्यात आला नाही किंवा ट्रेलरमधून ते हटवण्यातही आलेलं नाही.
आता तोच ट्रेलर तेलुगूमध्ये डब करून रिलीज करण्यात आला आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये ‘लेझीम डान्स’ पाहायला मिळत आहे.
पण चित्रपटाच्या ‘तेलुगु व्हर्जन’मध्येही हा डान्स कट करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘लेझीम डान्स’

पाहून महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांनी आक्षेप घेतला होता.

पण आजही अनेक सोशल मीडिया यूजर्स चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसकडून हे गाणे रिलीज करण्याची मागणी करत आहेत.

मात्र अद्याप यासंदर्भात ‘मॅडॉक फिल्म’कडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

5 दिवस सुरू होतं गाण्याचं शूटिंग

या गाण्याबद्दल बोलताना ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र रायजीची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला होता की,

बुऱ्हाणपूरची लढाई जिंकल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडला त्यांच्या घरी येतात,

असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या खास प्रसंगी, त्यांचे भव्य स्वागत केले जाते आणि त्याच दरम्यान उत्सवाचे एक गाणे सुरू होते.

लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ या उत्सवात दाखवण्यात आला होता.

उत्सवादरम्यान महाराजांचे दोन साथीदार त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्या हातात लेझीम ठेवतात, त्यानंतर महाराज लेझीम खेळतात.

आम्ही या गाण्याचं 5 दिवस शूटिंग करत होतो आणि चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी कोरिओग्राफरला सांगितले होते

की त्यांना महाराजांचे कोणतेही नृत्य नको आहे, त्यांना फक्त निव्वळ लेझीम खेळ दिसायला हवा होता.

त्यानुसार हे गाणे कोरिओग्राफ करण्यात आले अशी आठवणही संतोष जुवेकरने सांगितली होती.

Read more here : 

https://ajinkyabharat.com/champions-trophynar-rohit-sharma-nivrhi-ghee-gautam-gambhir/

 

Related News