सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्रीच्या
वेळेला पाऊस पडत असून हवामानाचे मिश्रण होत आहे. भारतीय
हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला
आहे. विशेषत: मुंबईसह कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह
पाऊस पडण्याची शक्तता आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात
उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.
सोमवारी, IMD ने मुंबईसाठी किमान तापमान 25.99 अंश
सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला असून दिवसभर हलका ते
मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 29.23
अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार,
कोकण (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), मध्य
महाराष्ट्र (नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली,
सातारा, कोल्हापूर, सोलापूर) यासह महाराष्ट्रातील अनेक भागात
पावसाची शक्यता आहे. तथापी, मराठवाडा (छत्रपती
संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड) आणि विदर्भ
(बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर,
भंडारा, गोंदिया, गडचिरोली) मध्ये मुसळधार पावसाची शक्यता
आहे. दरम्यान, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात गेल्या
24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
याशिवाय, मुंबई उपनगरात पुन्हा हलक्या पाऊस पडला.
Read also: https://ajinkyabharat.com/massive-fire-at-mandai-metro-station-in-pune/