सम्यक संबोधीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सम्यक संबोधी

डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

अकोट : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सम्यक संबोधी संस्थेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, सम्यक संबोधी संस्था व अजिंक्य भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सम्यक संबोधी सभागृह प्रांगणात आयोजित कार्यक्रमात डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले.

यावेळी सम्यक संबोधी संस्थेचे उपाध्यक्ष अजय आठवले, सचिव राहुल ओइंबे, ज्येष्ठ सदस्य एस. टी. वानखडे, लबडे साहेब, अहिर साहेब, प्रशांत तेलगोटे, दांडगे, पंकज खंडारे, रवी शिरसाठ, परशुराम तेलगोटे, रवी डोंगरे, अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम (I.A.S.) आदींसह तिक्ष्णगत सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार, सचिन पाटील, तसेच अजिंक्य भारतचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ सदस्य एस. टी. वानखडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ. सुगत वाघमारे यांनी आपल्या मनोगतात संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत “आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत” असा मोलाचा संदेश दिला.

Related News

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

read also : https://ajinkyabharat.com/lifers-marriage-7-shocking-truths-about-lifers-marriage-powerful-but-controversial-marriage/

Related News