बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न

बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी

झाल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना वार्ड क्रमांक ५ मध्ये घडली. महिलेचे पती आणि तिचे भाऊ यांच्यात वैयक्तिक वाद उफाळून

Related News

आल्याने थेट रुग्णालयातच एकमेकांवर तोंडाने आणि नंतर हातांनी हल्ला चढवण्यात आला.

हाणामारीमुळे रुग्णालयातील शांततेला सुरुंग लागला, डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून वार्ड सोडण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सुरक्षारक्षकांना पाचारण करून वादग्रस्त नातेवाईकांना बाहेर काढले.

दरम्यान, उपस्थित एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रीत करून

सोशल मीडियावर पोस्ट केला, आणि तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रशासनाने पोलिसांशी संपर्क

साधून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/four-cunning-youth/

Related News