भारताने पाकिस्तानला लोळवले टीम
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
इंडियाचा 7 विकेट्स आणि 25 चेंडू राखून विजय
भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सूर्यकुमार यादव (नाबाद ४७), तिलक वर्मा (३१) आणि अभिषेक शर्मा (३१) यांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने १२८ धावांचे लक्ष्य सहज गाठले.
भारतीय संघ असा जिंकला
पाकिस्तानकडून सईम अयुब (०), मोहम्मद हारिस (३), फखर झमान (१७) आणि सलमान आगा (३) स्वस्तात बाद झाले. एकामागोमाग एक विकेट पडत असताना, साहिबजादा फरहानने ४४ चेंडूत ४० धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये शाहीन आफ्रिदीने १६ चेंडूत नाबाद ३३ धावा करत धावसंख्येत भर घातली. भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले.
शुभमन गिल (१०) लवकर बाद झाला तरी, अभिषेकने वेगवान खेळी केली. त्यानंतर तिलक आणि सूर्यकुमारने डाव सांभाळला आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. तिलक बाद झाल्यानंतर सूर्याने शिवम दुबेच्या साथीने यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
हार्दिकची खास कामगिरी
भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या सलामी फलंदाज सईम अयुब (०) याला जसप्रीत बुमराहच्या हाती झेलबाद केले. पहिल्या चेंडूवर बळी घेणारा तो आता दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अर्शदीप सिंगने असा पराक्रम केला होता. गेल्या वर्षी त्याने अमेरिकेविरुद्ध शायन जहांगीरचा बळी घेतला होता. पंड्याने या सामन्यात १ बळी घेण्यासाठी ३४ धावा दिल्या.
कुलदीपने घेतले ३ बळी
पाकिस्तानच्या डावाच्या ७ व्या षटकात आणि आपल्या पहिल्याच षटकात कुलदीपने अत्यंत किफायती गोलंदाजी करत केवळ २ धावा दिल्या. त्यानंतर, त्याने आपल्या दुसऱ्या षटकात अनुक्रमे हसन नवाज (५) आणि मोहम्मद नवाज (०) या दोघांना चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर बाद केले. या चायनामॅन गोलंदाजाने आपल्या चौथ्या षटकात साहिबजादा फरहानला (४०) तंबूत पाठवले. त्याने ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले
कुलदीप सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
आशिया चषक २०२५ च्या आपल्या पहिल्या सामन्यात यूएई क्रिकेट संघाविरुद्ध कुलदीपने ७ धावा देत ४ बळी घेतले होते. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २ सामन्यांत ७ बळी घेतले आहेत. या कामगिरीमुळे तो सध्या या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. आज कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला, ज्यात त्याने प्रभार्व कामगिरी केली आहे.
अभिषेकची धडाकेबाज फलंदाजी
भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या अभिषेकने पहिल्याच चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने पॉवरप्ले षटकांचा पूर्ण फायन घेत केवळ १३ चेंडूत ३१ धावा केल्या. आपल्या या छोट्या पण वेगवान खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तो साय अयुबच्या गोलंदाजीवर बाद झाला. आपल्या पहिल्या सामन्यात अभिषेकने ३० धावा केल्या होत्या. एकंदरीत भारताने पाकिस्तानवर मिळविला हा विजय या आशिया चषक कप साठी महत्त्वाचा ठरला असून भारतात सर्वत्र क्रीडा प्रेमीनीं एकच जल्लोष केला आहे
केंद्र सरकारने PM Kisan सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी 2019 पासून सुरु झालेल्या या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्त्यांद्वारे लाभ मिळाला आहे. एका हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातात.वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑगस्ट रोजी 20 वा हप्ता जारी करण्यात आला, ज्यात 9 कोटी 71 लाख 41 हजार 402 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले गेले.
PM Kisan सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार काही संशयास्पद प्रकरणांमुळे काही शेतकऱ्यांना लाभ थांबवण्यात येणार आहे.
यामध्ये दोन मुख्य बाबी आढळल्या आहेत:
1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेले शेतकरी – हे शेतकरी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आहेत.
एकाच कुटुंबातील एक पेक्षा अधिक शेतकरी लाभ घेणे – यात पती-पत्नी, 18 वर्षावरील सदस्य किंवा 18 वर्षांखालील मुलांचा समावेश आहे.
सध्या या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी होत नसल्यामुळे, त्यांचा लाभ थांबवण्यात येईल. शेतकऱ्यांनी PM Kisan वेबसाईटवरील “Know Your Status” या विभागात जाऊन आपली स्थिती तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याचे लक्ष आता PM Kisan 21 व्या हप्त्याच्या वितरणाच्या तारखेवर केंद्रित झाले आहे. सरकार आणि संबंधित विभाग लवकरच त्याची माहिती जाहीर करणार आहेत. शेतकऱ्यांनी आपले खाते तपासणे आणि आवश्यक असल्यास कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shetkayanasathi-guidance/
तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत शिवार फेरी आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश नकाशावर असलेले व नसलेले शेत रस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीकृत ठेवणे हा आहे.कार्यक्रमास तहसीलदार समाधान सोनवणे, मंडळ अधिकारी संजय साळवे, सरपंच रविकिरण काकड यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या समस्या ऐकल्या.शिवार फेरीदरम्यान अतिक्रमित रस्ते आणि वापरात असलेले शेत रस्ते यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि प्रशासनाला उपयुक्त सूचना दिल्या.हा उपक्रम स्थानिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून भविष्यात अशा फेरींमुळे शेतकऱ्यांना अधिक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/tarunancha-future/
मेरठमध्ये “एफेबल डिझाइन कंपनीज” नावाच्या कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरवर पोलिसांनी हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांना या धंद्याची माहिती गुप्तहेराकडून मिळाली होती. तरुणांचे भविष्य घडवण्याच्या नावाखाली या सेंटरमध्ये वेश्याव्यवसायाचा अवैध धंदा सुरू होता.
मुख्य मुद्दे:
छापेमारी सीओ सिव्हिल लाइन्स अभिषेक तिवारी यांच्या नेतृत्वाखाली नौचंदी व मेडिकल पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
पोलिसांना पाहताच सेंटरमध्ये गोंधळ उडला, लोक पळण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्या पोलिस फौजेमुळे कोणीही पळून जाऊ शकले नाही.
घटनास्थळी रिसेप्शनिस्टसह 9 मुली सुटल्या; 4 तरुणांनाही अटक झाली.
एकूण 5 जण अटक: राजवीर, साकलम, नवाजिश, माज, आसमा सचदेवा.
धंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवला जात होता, जिथे ग्राहकांना मुलींचे फोटो ऑनलाइन पाठवले जात होते.
ही घटना मेरठच्या नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांच्या सततच्या कारवाईतून हे स्पष्ट झाले की शहरात अनेक अवैध वेश्याव्यवसायाचे गट सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच कबाडी बाजारातील पाच कोठ्यांवर छापा टाकून 17 मुलींची सुटका केली गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत धंदा चालवणाऱ्या संघटनेवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकाराने तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अवैध व्यवसायावर लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
अकोट तालुक्यात महिला शक्ती फाउंडेशनच्या कार्यक्रमात स्त्रीशक्ती जागरुकता; ग्रंथवाचन आणि सत्कार
अकोट तालुक्यातील ग्राम देवरीमध्ये महिला शक्ती फाउंडेशनचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाले. २५ वर्षांपासून प्राध्यापक रवींद्र ओहेकर यांच्या अखंड ग्रंथवाचनाच्या परंपरेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात गावातील अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदेश रजाने, अध्यक्षा लक्ष्मीताई गावंडे, सचिव गणेशराव वाकोडे आणि सदस्य पुष्पाताई तिहिले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्त्रियांना भारतीय संविधानानुसार त्यांच्या हक्कांचा अधिकार कसा मिळवावा, याची माहिती देणे आणि महिला शक्ती जागृत करणे हा होता.
लक्ष्मीताई गावंडे यांनी यावेळी सांगितले की, “महिला शक्ती फाउंडेशन कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव तयार आहे. स्त्रियांनी एकत्र येऊन आपले हक्क प्राप्त करणे गरजेचे आहे.” याचबरोबर सचिव गणेशराव वाकोडे यांनीही संघटनेच्या माध्यमातून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांशी सामना करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात शेकडो महिलांनी प्रवेश नोंदविला. ग्रामातील मोहन्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी संघटना सतत प्रयत्नशील आहे. यावेळी ग्रंथवाचक रवींद्र ओहेकर यांचे सत्कारही करण्यात आले. प्रभाकर बोरकर यांनी सूत्रसंचालन करताना भारतीय संविधानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारांची जोपासना प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित केले.कार्यक्रमाला दादाराव तायडे, भगवान सरदार, मुकुंदा तायडे, शामराव तायडे, पंढरी वानखडे, अरुण तायडे, गोवर्धन वानखडे, प्रकाश शिरसाट, कैलास तायडे, जगदेव तायडे, सचिन भाऊ तायडे आणि रमेश थोरात हे प्रमुख उपस्थित होते.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात स्त्रीशक्ती जागरूकतेसह सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा स्त्रियांसमोर ठेवली गेली, तर ग्रंथवाचनाच्या माध्यमातून संस्कार आणि न्यायसंबंधी शिक्षणाची संधीही प्रदान करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/bhadgavamadhye-hotlet-terrible-explosion/
जळगाव भडगावमध्ये हॉटेलात भयानक स्फोट, १०-१५ जण जखमी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात सकाळी मोठा स्फोट झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये सकाळी चहा पिण्यासाठी बसलेले दहा ते पंधरा ग्राहक अचानक मोठ्या स्फोटाचा बळी ठरले. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्फोटाचा आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या इमारती व परिसर हादरले.स्फोटानंतर नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने भडगाव व पाचोरा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार काही जखमींना गंभीर जखमा आल्या आहेत.स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. प्रारंभिक अंदाजानुसार, हा स्फोट गॅस सिलेंडर किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरमुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला हातभार लावला. त्यांनी जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती घेतली आणि प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले.भडगावकरांमध्ये या स्फोटामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी परिसर सील करुन तपास सुरू केला आहे. प्रशासन आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी तैनात असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे का याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. पुढील तपास पोलिस सुरू ठेवणार आहेत आणि स्फोटाचे कारण निश्चित होताच अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.
read also : https://ajinkyabharat.com/1xbet-betting-app/
बॉलिवूडमध्ये मोठा थरार उडाला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांना समन्स जारी केले आहेत. हे समन्स 1xBet बेटिंग App प्रकरणातील बेकायदा ऑनलाईन बेटिंग आणि मनी लाँड्रींग प्रकरणात जारी करण्यात आले आहेत. ईडीने उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी आणि मिमी चक्रवर्ती यांना १५ सप्टेंबर रोजी दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, या चौकशीत या दोघींपासून जाणून घ्यायचे आहे की 1xBet App ची जाहिरात करताना त्यांना पैसे कसे, कधी आणि कोणाकडून मिळाले? तसेच, या बेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेल्या मनी लाँड्रींगच्या कारवाईत त्यांचा सहभाग कितपत होता, हे तपासले जाणार आहे.या प्रकरणात फक्त उर्वशी रौतेला आणि मिमीचाच समावेश नाही. याआधीही अनेक हाय-प्रोफाईल हस्तींना ईडीने या प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले होते. जून २०२५ मध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, युवराज सिंह, सुरेश रैना, अभिनेता सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांना 1xBet, FairPlay, Parimatch आणि Lotus 365 सारख्या बेटिंग Apps प्रमोशन केल्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. अलिकडे शिखर धवन यालाही ४ सप्टेंबरला समन्स बजावण्यात आले होते आणि त्यांनी PMLA कायद्यांतर्गत आपला जबाब नोंदवला होता. त्यापूर्वी, सुरेश रैना यानेही ऑगस्ट महिन्यात दिल्लीत हजर होऊन आपले जबाब नोंदवले होते.ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बेटिंग नेटवर्कशी जोडलेल्या इतर व्यक्तींवर देखील लवकरच कारवाई होऊ शकते. संस्थेचा उद्देश या संपूर्ण अवैध नेटवर्कला मूळापासून उखडून टाकणे आणि मनी लाँड्रींग प्रकरणात सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींना कायद्याच्या चौकटीत आणणे आहे.उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती यांना 1xBet App संदर्भात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून, ईडीला यांना किती पैसे मिळाले, कोणाकडून मिळाले आणि ते कसे वापरले गेले, हे जाणून घ्यायचे आहे. या प्रकरणाचे उघडकीस येणारे तपशील बॉलिवूडसह संपूर्ण देशात चर्चा निर्माण करू शकतात.सट्टेबाजीच्या या अवैध नेटवर्कमुळे एक मोठा मनी लाँड्रींग सस्पेन्स उघडकीस आला असून, या प्रकरणातील पुढील तपासणीमध्ये आणखी कोणत्या हस्तींचा समावेश होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ईडीची ही कारवाई फक्त प्रकरणाची चौकशी नाही, तर संपूर्ण अवैध बेटिंग सिंडीकेटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे.बॉलिवूडमधील या सस्पेन्स प्रकरणामुळे या क्षेत्रातील जाहिरात आणि प्रमोशनच्या पद्धतींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती यांच्या चौकशीचा निकाल काय येईल आणि कोणत्या नव्या खुलाश्यांमुळे प्रकरणाची दिशा बदलेल, हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/both-kirko-vadatun-both-kutumbamadhyay-fierce-violence-ekacha-mritu-11-jan-jakhmi/
जळगाव : जिल्ह्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून आज तासो तास हिंसाचाराचा प्रकार उफाळला. “माझ्याकडे पाहून का थुंकला?” या किरकोळ कारणावरून गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये वाद चिघळला आणि लाकडी दांडे, पावड्या व इतर साहित्यांनी जोरदार मारामारी झाली.यात एकनाथ निंबा गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही कुटुंबातील एकूण ११ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका महिलाची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर सध्या जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, “अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही” अशी भूमिका ठेवली आहे.
रुग्णालयात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
या घटनेचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई, दि. १४:- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे.’साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या निवडीसाठी साहित्य महामंडळाशी निगडित सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मनापासून अभिनंदन आणि९९ व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/trumpchaya-dhamkinantar-chinachi-thanakavati-response/
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 50 ते 100 टक्के टॅरिफ लावावा, असा जोरदार इशारा दिल्यानंतर जागतिक अर्थकारणात सस्पेन्स वाढला आहे. भारतावर आधीच 50 टक्के टॅरिफ लादलेला असतानाही आता चीनवरही टॅरिफ लादण्याची योजना असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. मात्र चीनने त्यावर निर्भीड प्रतिसाद दिला असून, द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी शनिवारी स्लोवेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “संवेदनशील मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही शांततेच्या माध्यमातून चर्चेला प्राधान्य देतो. युद्ध हे अडचणींवरचे समाधान नाही. चीन युद्धात कधीच सहभागी होत नाही व युद्धाची कोणतीही योजना तयार करत नाही.” वांग यी यांच्या मतानुसार, जर अमेरिकेने चीनवर टॅरिफ लादले तर चीनदेखील तसाच प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.
वांग यी यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या काळात जगात अराजकता आणि संघर्षाची स्थिती वाढली आहे. त्यामुळे चीन आणि युरोपाने एकमेकांचे प्रतिस्पर्धी होण्यापेक्षा एकमेकांचे मित्र होऊन शांती व सुरक्षिततेचे मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले. चीनने आपली भूमिका जागतिक शांततेचा रक्षक व जबाबदार देश म्हणून स्पष्ट केली आहे.
ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लादण्याचे आवाहन केल्यावर आता जगभरातून या संकटाकडे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि चीनमधील या टॅरिफ वॉरमुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनच्या शांततेच्या वागणुकीने परंतु परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सर्वांचे लक्ष आता डोनाल्ड ट्रम्पच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. ट्रम्प चीनी प्रतिसादावर कसा उपाय करणार? टॅरिफ वॉर युद्धात रूपांतरित होईल की शांततेच्या चर्चेमार्गे तोडगा मिळेल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.