UK07 Rider चा धक्कादायक व्हिडीओ; लाईव्हमध्ये कार अपघातानंतर खळबळ

UK07 Rider

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला युट्यूबर आणि अनुराग डोभाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चाहत्यांमध्ये UK07 Rider या नावाने लोकप्रिय असलेल्या अनुरागने इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केलेल्या एका धक्कादायक कृतीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ‘आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे…’ असे भावनिक शब्द उच्चारल्यानंतर त्याने गाडी अतिवेगाने चालवत डिव्हायडरला धडक दिल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अनुराग डोभाल त्याच्या खासगी आयुष्यातील वादांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याने केलेल्या काही व्हिडीओ आणि पोस्टमुळे त्याच्या कुटुंबातील वाद समोर आले होते. त्यानंतर आता लाईव्हमध्ये घडलेल्या या घटनेमुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

लाईव्हमध्ये भावनिक वक्तव्य

घटनेपूर्वी अनुरागने इन्स्टाग्राम लाईव्ह सुरू केला होता. या लाईव्हदरम्यान तो खूप भावनिक अवस्थेत दिसत होता. त्याने आयुष्यातील एकटेपणा आणि कुटुंबापासून झालेल्या दुराव्याबद्दल बोलताना काही गंभीर विधानं केली.

Related News

लाईव्हमध्ये बोलताना अनुराग म्हणाला,
आयुष्यात आपली माणसंच राहिली नाहीत, तर फोन तरी कोणाला करू… आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे…

हे शब्द ऐकून अनेक चाहत्यांनी लाईव्हमध्येच त्याला शांत राहण्याचं आणि गाडी थांबवण्याचं आवाहन केलं. मात्र त्यानंतर काही क्षणांतच तो कार अतिवेगाने चालवत असल्याचं दिसलं.

200 च्या वेगाने कार, डिव्हायडरला धडक

लाईव्ह सुरू असतानाच अनुराग कार सुमारे 200 किमी प्रतितास वेगाने चालवत असल्याचे दिसत होते. काही क्षणांनंतर कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने अनुरागला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र हा अपघात जाणीवपूर्वक आत्महत्येचा प्रयत्न होता का, की फक्त बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

अनुराग डोभाल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या खुलाशांमुळे चर्चेत होता. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये सांगितले होते की, त्याने स्वतःच्या इच्छेने लग्न केले, पण त्याच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं.

अनुरागच्या म्हणण्यानुसार,
तो दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केल्यामुळे कुटुंबात वाद निर्माण झाले. हे वाद इतके टोकाला गेले की शेवटी त्याने कुटुंबापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

या सर्व गोष्टींमुळे त्याच्या आयुष्यात मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचंही त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

भावाने केले गंभीर आरोप

दरम्यान, अनुरागच्या या दाव्यांवर त्याचा भाऊ कलाम यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही स्क्रीनशॉट शेअर करत अनुराग खोटं बोलत असल्याचा आरोप केला.

कलामने पोस्टमध्ये लिहिलं की,
“या प्रकरणाबद्दल लोकांना पूर्ण माहिती नाही, त्यामुळे कोणीही यात पडू नये.”

त्याने आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलं की,
“अनुराग आपल्या पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळेच ती त्याला सोडून गेली. सध्या तो जे काही करत आहे, ते फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी आहे.”

या आरोपांमुळे हा वाद आणखीच चिघळला आहे.

‘बिग बॉस 18’मुळे वाढली लोकप्रियता

अनुराग डोभाल याची लोकप्रियता सोशल मीडियावर आधीपासूनच मोठी आहे. त्याच्या बाइक रायडिंग आणि ट्रॅव्हल व्लॉग्समुळे तो तरुणांमध्ये प्रसिद्ध झाला.त्यानंतर तो रिअॅलिटी शो Bigg Boss 18 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. शोमधील त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे तो सतत चर्चेत राहिला.

चाहत्यांची चिंता वाढली

लाईव्हदरम्यान घडलेल्या या घटनेनंतर त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या तब्येतीबद्दल विचारणा केली आहे, तर काहींनी त्याला मानसिक आधार देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी असेही मत व्यक्त केले की, इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर्सवर वाढत असलेला मानसिक ताण हा गंभीर विषय आहे आणि याकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.

अधिकृत माहितीची प्रतीक्षा

सध्या या प्रकरणाबाबत पोलिसांकडून किंवा अनुरागच्या टीमकडून अधिकृत निवेदन आलेले नाही. अपघाताची नेमकी कारणं आणि त्यामागील परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी अधिकृत तपासाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक जण या घटनेबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत.

read  also :   https://ajinkyabharat.com/iaschan-dream-tutlan-chaha-lottery-weekly-22-year-old-badallam-life/

Related News