स्वामी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीबाबत आली मोठी अपडेट

स्वामी शांतिगिरी महाराज

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल यावर मागील एक महिना नाट्यमय घडामोडी घडल्या.

विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरू असताना ऐनवेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा.

आपला दुसरा अर्ज शिंदे शिवसेनेकडून दाखल केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Related News

मात्र काल (२मे) रोजी महायुतीच्या शिंदे सेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्वामी शांतिगिरी महाराजांना ३ मेच्या आत एबी फॉर्म देण्याची नोटीस निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी बजावली होती.

त्यामुळे आज तातडीने स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत.

आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला असल्याची माहिती दिली आहे.

स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी करणार असल्याची घोषणा केली होती.

शांतिगिरी महाराज यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात आली.

मात्र शिंदे सेनेकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा दावा कायम ठेवत अनेक राजकीय घडामोडीनंतर नाशिक लोकसभेची जागा ही

शिंदेंनी आपल्याकडेच ठेवत पुन्हा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

त्यामुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांना माहिती करून उमेदवारी न मिळाल्यामुळे आता त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे हिंदू मतांची विभागणी होऊन महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो.

अशी शक्यता असताना माहितीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी मागणी केली.

मात्र स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी करणार आणि मतदारांना माहिती आहे.

हिंदू कोण त्यामुळे मतदार ठरवतील असे वक्तव्य करत महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीनंतर आता तुल्यबळ लढतील

स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणुक ही चांगलीच चर्चेत आली आहे.

आज स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून दाखल केलेला उमेदवारी अर्जाची पूर्तता न करता अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे आता महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपली प्रमुख लढाई ही निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे असणार, असे सांगत विजयाची खात्री व्यक्त केली आहे.

Related News