अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी…वंचित बहुजन आघाडीने दिला भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला पाठिंबा…

राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती..

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अकोला पश्चिम मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राजकीय

वर्तुळात एकच खळबळ उडाली होती… कारण अकोल्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच

राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे

Related News

या ठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती..

वंचित शेवटी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र वंचित ने काँग्रेस

आणि भाजपच्या उमेदवारा विरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार

असल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं तर नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार

असल्याचं म्हटलं होतं…अखेर आज वंचित बहुजन आघाडीने हा सस्पेन्स उघड केला

असून आपला पाठिंबा भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला

आहेय..वंचितने आपला पाठिंबा हरिष अलिमचंदनी यांना जाहीर केल्यानंतर

आता भाजप आणि काँग्रेसमध्ये होणारी

अकोला पश्चिमची लढत तिरंगी लढत होणार आहेय…

 

 

Related News