“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”

मोदींनी आदमपूरवरून दिला निर्धाराचा संदेश: “दहशतवादाला आता चोख प्रतिउत्तरच”

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन

भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर

कार्यरत जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि पुढील धोरणाची स्पष्ट दिशा दाखवली.

Related News

मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे भारताचं ‘न्यू नॉर्मल’ आहे. आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना

भारत शांत बसून बघणार नाही. आम्ही आमच्या अटींवर, आमच्या वेळेनुसार आणि आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहोत.”

परमाणू धमक्यांना नाही घाबरणार!
पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांवरही ठाम भूमिका घेतली.

“कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत आता भीक घालणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

सेनेच्या सामर्थ्याला सलाम
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांची एकत्रित कामगिरी मोदींनी विशेषत्वाने उल्लेखली.

“वायूदलाने आकाशातून हल्ला करत संरक्षण केलं, नौदलाने समुद्रात आपली ताकद दाखवली आणि भूदलाने सीमारेषेवर अचूक लक्ष ठेवले.

बीएसएफसह इतर दलांनीही उत्कृष्ट समन्वय साधला,” असे मोदी म्हणाले.

“मला जवानांचा अभिमान आहे”
पंतप्रधानांनी विशेषतः जवानांच्या शौर्याचे कौतुक करत म्हटलं, “पाकिस्तानकडून कितीही प्रयत्न झाले,

तरी आपली लष्करी यंत्रणा अडथळ्याविना कार्यरत राहिली. मला माझ्या प्रत्येक जवानाचा अभिमान आहे.”

कारवाई थांबली, सज्जता नाही
शेवटी मोदींनी स्पष्ट केलं की भारताने सध्या केवळ कारवाई स्थगित केली आहे.

“जर पाकिस्तानकडून पुन्हा अतिरेकी कारवाया किंवा हालचाली झाल्या, तर आम्ही तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर देऊ.

जवानांनी कायम सज्ज आणि सावध राहावं, असं मी सांगतो,” असा इशारा त्यांनी दिला.

READ MORE HERE

https://ajinkyabharat.com/saryanayadhishchaya-matoshrincha-clear-sur-ball-paparch-safe-dandalan-vishwas-japan-gargcha/

Related News