बीडमध्ये मनोज जरांगे पाटील लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले

बीडमधील एका रुग्णालयात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लिफ्ट अपघाताची धक्कादायक घटना घडली. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. सुदैवानं पाटील आणि त्यांचे सहकारी सुरक्षित आहेत. लिफ्टचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.