आरोग्यावर दुष्परिणाम, दात होतायत कमकुवत, संशोधनातून समोर
प्रत्येक पालक आपल्या मुलांचे लाड करतात, त्यांना हव्या त्या
गोष्टी देण्याच्या प्रयत्न करतात. पण मुलांचे काही हट्ट असे असतात,
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
जे त्यांच्या आरोग्यासाठी तसेच भविष्यासाठी चांगले मानले जात
नाहीत. तरीसुद्धा प्रेमापोटी पालक आपल्या मुलांचे नको असलेले
हट्ट पुरवतात. सध्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे
त्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं दिसून
येतंय. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांचे दातही खराब होत आहेत.
कोल्ड्रिंक्स आणि चिप्स यांसारख्या गोष्टी मुलांच्या आवडीच्या जरी
असल्या तरी मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनाने पुष्टी केली आहे की, या गोष्टींचे
जास्त सेवन केल्याने मुलांच्या दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो
आणि ते कमकुवत होतात. याचे मुख्य कारण म्हणजे सोडा आणि
ऍसिड यासारख्या हानिकारक गोष्टी या पदार्थांमध्ये असतात.
जगाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: शहरी भागात, शीतपेये आणि
प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वापर अलीकडच्या काळात वाढला
आहे. मुले या गोष्टींकडे थेट आकर्षित होतात. खरे तर याचे कारण
रंगीत पॅकेजिंग, चव आणि परवडणाऱ्या किमती. कोल्ड ड्रिंक्स, सोडा,
एनर्जी ड्रिंक्स आणि फ्लेवर्ड वॉटर सहसा साखर आणि ऍसिडने भरलेले
असतात. त्याचप्रमाणे, चिप्स – ज्यामध्ये स्टार्च आणि मीठ जास्त असते,
ज्यामुळे मुलांच्या दातांना हानी पोहोचवते. संशोधनात असे आढळून
आले आहे की गर्भधारणेदरम्यान गुणसुत्रे आणि पोषणाचा अभाव हे देखील
दात किडण्याचे कारण असू शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की,
जर पालकांनाही दातांचा त्रास होत असेल तर मुलांमध्ये असे होणे सामान्य
आहे. त्याचबरोबर गरोदरपणात आईला पुरेसे पोषण न मिळाल्याने पोटात
वाढणाऱ्या बाळाचे दात खराब होऊ शकतात. याव्यतिरिक्त, मुलांमध्ये
सध्या मधुमेह एक गंभीर समस्या बनत चाललीय, हे देखील दात कमकुवत
होण्याचे एक कारण असू शकते.
Read also: https://ajinkyabharat.com/tiktok-stars-and-vloggers-banned-from-police-in-pakistan/