श्रीनगर –
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून,
देशभरात सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने बारामुल्ला
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
जिल्ह्यात मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
ही कारवाई लाइन ऑफ कंट्रोल (LoC) जवळ घडली असून, घुसखोरीचा प्रयत्न वेळीच
हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. भारतीय लष्कराने या दोन दहशतवाद्यांकडून दोन रायफल्स,
मोठ्या प्रमाणावर कारतूस, गोळाबारूद आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.
दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलन आणि चॉकलेट सुद्धा जप्त
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, मारलेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलन, चॉकलेट,
सिगरेटच्या पाकिटांचा स्टॉक, तसेच इतर वैयक्तिक वस्तूही सापडल्या आहेत.
यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी पूर्ण तयारीनिशी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला दबाव
गेल्या काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 28 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर TRF या दहशतवादी संघटनेचे संबंध आणि हालचालींवर अधिक बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
सर्च ऑपरेशन सुरूच
बारामुल्ला येथे यशस्वी कारवाईनंतर देखील सुरक्षा यंत्रणा सतत सर्च ऑपरेशन्स राबवत असून,
काश्मीरमध्ये घुसलेल्या उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
भारतीय लष्कर, BSF आणि स्थानिक पोलिस यांचे संयुक्त ऑपरेशन सध्या जोरात सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyacha-mastermind-angle/