बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेनं शिवशाही बसच का निवडली?

बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेनं शिवशाही बसच का निवडली?

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे यानं

एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरातील शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे साडे

Related News

पाचच्या सुमारास फलटणला निघालेल्या तरुणीवर बलात्कार झाला. बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे

असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. दत्तात्रय गाडे हा हिस्ट्री शीटर गुन्हेगार आहे.

त्याच्यावर यापूर्वी चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून तो जामिनावर बाहेर होता.

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करताना गाडेनं शिवशाही बसमध्ये केला.

आरोपीनं शिवशाही गाडीच का निवडली असावी?

स्वारगेट बसस्थानकात अनेक गाड्या उभ्या असताना देखील दत्तात्रय गाडेनं त्या पीडित तरुणीला शिवशाही बसमध्ये का नेलं असावं?

हे शिवशाही बसच्या रचनेवरुन स्पष्ट होतं. साध्या किंवा निमआराम गाडीला केवळ एक दरवाजा असतो.

शिवशाही बसला दोन दरवाजे असतात. एक दरवाजा बसमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि दुसरा  दरवाचा शिवशाही

बस वातानुकुलित असल्यानं चालक आणि प्रवासी आसनांच्यामध्ये असतो. याशिवाय शिवशाही बसच्या काचेची रचना देखील अखंड असते.

ती मागे पुढे ढकलता येत नाही. याशिवाय शिवशाही बसमध्ये पडदे देखील असतात. त्यामुळं बाहेरुन आता काय चाललंय हे दिसत नाही.

त्यात गाडेनं पहाटेच्या अंधारात हे कृत्य केलं. दोन्ही दरवाजे बंद, काचा बंद, पडदे यामुळं पीडित तरुणीनं

आरडाओरडा जरी केला असला तरी बाहेरुन मदत मिळणं अशक्य असल्याचं दिसतं.

कारण शिवशाही बस पूर्णपणे बंद झाल्यानंतर बाहेर आवाज जाणं अशक्य असतं.

यामुळंच आरोपीनं शिवशाही बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार केला.

वाहक असल्याचं सांगून तरुणीची फसवणूक

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील त्या शिवशाही बसच्या चालकाने वरिष्ठांना जबाब दिला आहे.

तो जबाब एबीपी माझाच्या हाती लागला असून “मी “त्या” बसचा वाहक आहे”

असे सांगून आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्याचं चालकानं म्हटलं आहे.

स्वारगेट ते सोलापूर एस टी बस विनावाहक (कंडक्टर) होती. मंगळवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी

एस टी बस (एच 06 BW 0319) स्वारगेट आगारात पोहोचली होती. या बस चालकाने बस स्वारगेट

बस स्थानकात रसवंतीगृहासमोर पुढे उभी केली. “सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मी या बसचा वाहक आहे

असे म्हणून एका महिला प्रवाशाला एका अज्ञात प्रवाशाने बसमध्ये घेऊन गेले व त्यांच्या सोबत जबरदस्ती केली”

असे जबाबात नमूद केले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/uday-samantanchi-announcement/

Related News