नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा सामना सुरु असताना महेंद्रसिंग धोनीची पत्नीhttp://महेंद्रसिंग धोनी साक्षीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये साक्षीने सामना लवकर संपला, असे म्हटले आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा सनरायझर्स हैदराबादबरोबर होता. या सामन्यात चेन्नईने ७८ धावांनी मोठी विजय साकारला. ऋतुराज गायकवाडच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तुषार देशपांडेने चार बळी मिळवले आणि चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळेच चेन्नईला हैदराबादच्या संघाला १३४ धावांत ऑल आऊट करता आले आणि मोठा विजय साकारता आला. चेन्नईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. यापूर्वी चेन्नईचा संघ हा सहाव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर चेन्नईचा संघ थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पण या विजयानंतर साक्षीची पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे.
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
खूपच आक्रमक आणि… ‘त्याला विचारण्याचा प्रयत्न केला’; अजिंक्य रहाणेने विराट कोहलीबाबत उघड केलं मोठं गुपित
भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे यान...
Continue reading
आईच्या निधनानंतर तीन महिने नैराश्यात गेल्याचा भावनिक खुलासा अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केला आहे. अमोल कोल्हे, त्यांच्या प्रॉडक्शन टीम आणि कुटुंबीयांनी दिलेल्या आधारामुळेच आपण सा...
Continue reading
18 वर्षांनंतर Stephen Flemingचा CSKला निरोप; 5 IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या मास्टरमाइंडचा ऐतिहासिक निर्णय
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी तब्बल 18 वर्षांनंतर स...
Continue reading
7 व्हायरल मीम्स! 'अल्फा'वर नेटकऱ्यांचा हल्लाबोल, 'बॉलिवूड नाही तर कॉपीवूड' म्हणत आलिया भट्ट ट्रोल
मुंबई : यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित 'अल्फा' चित्रपट अखेर...
Continue reading
आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मालकीण काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मात्र यावेळी कारण क्रिकेट किंवा आयपीएल नसून तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबं...
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रेन, मुसळधार पाऊस आणि वाहतूक ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एक...
Continue reading
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या विस्फोटक फलंदाजीची झलक दाखवत क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या त...
Continue reading
IND A vs SL A : 49व्या षटकातील 3 विकेट्सचा चमत्कार, तिलक वर्माने सांगितला सामन्याचा खरा टर्निंग पॉइंटकोलंबो : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिरंगी मालिकेच्या सलामीच्या सामन्...
Continue reading
IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडचा ऐतिहासिक पराक्रम! 100व्या सामन्यात शतक झळकावत विराट कोहलीचा दमदार रेकॉर्ड मोडला
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारत-अ संघाने तिरंगी वनडे मालिकेची सुरुव...
Continue reading
ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, 100व्या सामन्यात ठोकलं दमदार शतक
भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाज ऋत...
Continue reading
साक्षीने या पोस्टमध्ये म्हटले होते की, ” चेन्नईच्या संघाने आजचा सामना लवकर संपवावा, कारण बेबी येणार आहे. होणाऱ्या आत्याकडून ही विनंती आहे.” काही जणांना साक्षीच्या पोस्टनंतर धोनीच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचे वाटले होते. पण साक्षीने या पोस्टमध्ये आत्याकडून विनंती असेल म्हटले आहे, त्यामुळे धोनीच्या भावाच्या किंवा मित्राच्या घरी नवीन पाहुणा येणार, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे चेन्नईच्या संघानेही साक्षीची ही गोष्ट ऐकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण चेन्नईच्या संघाने हैदराबादच्या संघाला ऑल आऊट करत हा सामना सात चेंडू लवकर संपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साक्षीची पोस्ट ही जोरदार व्हायरल झाली आहे.
चेन्नईच्या संघासाठी हा विजय महत्वाचा आहे. कारण यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या विजयासह चेन्नईची गाडी रुळावर आली आहे. त्याचबरोबर या विजयासह चेन्नईच्या संघाचे १० गुण झाले आहेत. त्यामुळे आता चेन्नईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीमधील प्रबळ दावेदार असल्याचे समोर येत आहे.