अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच घडलेल्या विमान अपघातात आले आहे.
अहमदाबाद विमान अपघातात अकोट येथील दाऊलालजी भंडारी यांची नात व डॉ. चंचल भंडारी यांची अडीच
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
वर्षांची चिमुकली अत्यंत अकल्पित संकटातून बचावली आहे.तिची देखरेख करणारी आया त्या क्षणी देवदूत ठरली आहे.
प्राप्त माहितीनुसार,अकोटचे रहिवासी दाऊलालजी भंडारी यांची मुलगी डॉ. चंचल भंडारी या अहमदाबाद येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
अपघाताच्या वेळी त्या रुग्णालयात आपल्या कर्तव्यात व्यस्त होत्या. घरी त्यांची अडीच वर्षांची मुलगी आया सांभाळत होती.
विमान अपघाताच्या काही क्षण आधी, एक विमान आकाशातून थेट घराच्या दिशेने येताना दिसले.त्यामुळे परिसरात तारांबळ उडाली होती.
त्यामुळे घरातील आया हिने बाहेरील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काही क्षणातच विमानाचा स्फोट होऊन परिसरात आग लागली.
या आगीत डॉ. चंचल भंडारी यांचे घरही सापडले. घरात लागलेली आग पाहून त्या आयाने कोणतीही भीती न बाळगता
आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील बालिकेला उंचावरून खाली फेकले व स्वतःही
जीवाची पर्वा न करता उडी घेतली.खाली उभ्या असलेल्या नागरिकांनी तत्काळ पुढे येत दोघींनाही पकडले.
ही घटना केवळ धाडसाचे नव्हे,तर मातृहृदयाच्या मायेच्या सर्वोच्च अभिव्यक्तीचे प्रतीक ठरते.सुदैवाने,डॉ.चंचल भंडारी यांची मुलगी सुरक्षित आहे.
आगीत घर भस्मसात
विमान जमिनीवर कोसळल्यानंतर स्फोट होऊन आगीचे लोळ उठले.त्यामुळे परिसरातील नागरी वस्तीत आग लागली होती.
आगीच्या विळख्यात डॉ.चंचल भंडारी यांचे घरही सापडले. आगीत संपूर्ण साहित्य खाक झाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/heritage-hotalemadhil-lagnasohit-theft-2-lakh-43-thousands/