मुंबई (प्रतिनिधी): “बडे बाप का बेटा” असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तवाचे अनुभव आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात मांडले आहेत.
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
पत्राचाळ प्रकरणात अटकेनंतर संजय राऊत जवळपास १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात होते.
याच काळात ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला आर्यन खान देखील तिथेच होता.
दोघांचा मुक्काम ‘दहा नंबर यार्ड’ मध्ये होता.
आर्यन खानचा तुरुंगातील दिनक्रम
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, “आर्यन तुरुंगात फारसं काही खात नसे.
तो फक्त फळं आणि पाण्यावर राहायचा. कोणाशीही फारसा बोलायचा नाही.”
एकदा त्याच यार्डातील सहाय्यकाने ब्रँडेड टी-शर्ट घातलेला पाहून राऊतांनी विचारलं,
त्यावर तो म्हणाला, “आर्यन खान जाताना मला हा टी-शर्ट दिला.”
‘अटका प्रसिद्धीच्या हव्यासापोटी’ — राऊतांचा आरोप
राऊत यांनी स्पष्ट केलं की, तपासात आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ आढळले नव्हते,
आणि त्याने ड्रग्स घेतल्याचेही काही पुरावे नव्हते. “पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही अटक झाली,”
असा थेट आरोप त्यांनी पुस्तकात केला आहे.
जेलमधील पैसेखोरीचा पर्दाफाश
राऊत यांनी आणखी एक खुलासा करत सांगितलं की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा
यालाही तुरुंगात सवलती मिळाव्यात म्हणून फोन आणि पैशांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण जेल प्रशासनाने त्याला जनरल यार्डातच ठेवले.
“जेल पैशावरच चालते आणि चालवली जाते, यावर माझी श्रद्धा आहे,” असं त्यांनी पुस्तकात स्पष्टपणे नमूद केलं आहे.
या पुस्तकातील खुलास्यांमुळे सेलिब्रिटींच्या तुरुंगातील जगण्याचे वास्तव समोर येत असून,
सामान्य कैद्यांसारखीच वागणूक त्यांनाही दिली गेल्याचे स्पष्ट होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-municipal-area/