अर्जुन खोतकर लवकरच दानवेंच्या प्रचारात दिसणार?

अर्जुन खोतकर

जालना : जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी सकाळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची घरी जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज होऊन स्वतःला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचं चित्र मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत होतं. दरम्यान, आज सकाळी दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी भेट देऊन खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.

महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे. अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी जात भल्या पहाटे सदिच्छा भेट घेतली.

मी बाहेरच्या प्रचारामध्ये होतो, इथल्या निवडणुका आता सुरू झाल्या आहेत. पूर्ण प्रचार सुरू झाला नाही, जेव्हा केव्हा सुरु होईल तेव्हा मी उतरेल. निवडणुकीच्या काळामध्ये अशा भेटी होत असतात, वेगळी थोडी भेट आहे, गेली ४० वर्षे आम्ही भेटतोच. येणाऱ्या काळात दानवे यांचा प्रचार करणार का, दोन दिवसाचा अवधी मी मागितलेला आहे. वरिष्ठाशी बोलून मी कळवणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले.

Related News

नरेंद्र मोदीचा ४०० पारचा नारा, बाकी सगळ्या कामावर जनता खुश आहे. दोन-तीन मुद्दे आम्हाला अडचणीचे वाटतात. बाकी तर कामाबाबत आम्हाला समाधान वाटतं, असंही ते म्हणाले.

निवडणूक कोणतीही हलक्यात घ्यायची नसते. ही निवडणूक रावसाहेब दानवे हे देखील हलक्यात घेणार नाहीत आणि कल्याण काळे देखील हलक्यात घेणार नाही.

Related News