टोकियो ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्व
भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या
पॅरिस ऑलंम्पिकसाठी २८ सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे.
Related News
टोकियो ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा
भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
यावेळी नीरज चोप्रासोबत किशोर जेना हा ही भाला फेकताना दिसणार आहे.
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी
अन्नू राणी महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भाग घेणार आहे.
२८ जणांच्या या अॅथलेटिक्स संघात १७ पुरुष, ११ महिला खेळाडूंचा समावेश आहे.
नीरज चोप्रा आणि अन्नू राणी व्यतिरिक्त पुरुषांच्या ३००० मीटर
स्टीपलचेस अॅथलीट अविनाश साबळे,
आशियातील अव्वल शॉट पुटरपैकी एक तजिंदरपाल सिंग तूर,
महिला रेस वॉकर प्रियांका गोस्वामी आणि ४४०० मीटर रिले धावपटू मोहम्मद अनस,
अमोज पार्टिकन टू सुब्बा जॅकोटेड तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये सहभागी झाले होते.
अनसचे हे सलग तिसरे ऑलंम्पिक असणार आहे.
पारुल चौधरी ३००० मीटर स्टीपलचेस आणि ५००० मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे.
दोन वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी निवडलेली ती एकमेव खेळाडू आहे.
गेल्या वर्षी तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक
तर ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
राष्ट्रीय विक्रमवीर अक्षदीप सिंग, विकास सिंग आणि परमजीत सिंग
पुरुषांच्या २० किमी रेस वॉक स्पर्धेत भाग घेतील.
तर सूरज पनवार मिश्र मॅरेथॉन स्पर्धेत प्रियंका गोस्वामी सोबत सहभीगी होईल.
Read also: https://ajinkyabharat.com/sant-tukaram-maharaj-palkhine-banana-roti-crossing-ghat/