अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, अकोल्यात तीव्र निषेध

अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, अकोल्यात तीव्र निषेध

अमृतसर/अकोला:  २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना

पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याची लाजिरवाणी घटना घडली.

अमृतसरमधील हेरिटेज स्ट्रीटवर उभारलेल्या पुतळ्यावर एका व्यक्तीने हातोड्याने हल्ला केला.

Related News

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

या घटनेनंतर लोकांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपी आकाशदीप सिंग

(राहणार मोगा, पंजाब) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र, त्याने हे कृत्य का केले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

अकोल्यात तीव्र प्रतिक्रिया, वंचित बहुजन आघाडीचा निषेध

या घटनेचे पडसाद अकोल्यात उमटले असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी

निषेध आंदोलन छेडले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी,

अशी मागणी केली. यावेळी वंचित कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हातात घेत जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला.

घटनेमुळे संतप्त भावना, कठोर कारवाईची मागणी

या घटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असलेल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अशा प्रकारच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,

अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/akolidhi-shetkyancha-jachar-andolan-sarkarchaya-dhoranaonaan-bhajnachaya-talwar-prohibition/

Related News