अकोटमध्ये थोपण भिंतीच्या कामासाठी निधी मंजूर, पण प्रत्यक्ष काम सुरूच नाही!

अकोटमध्ये थोपण भिंतीच्या कामासाठी निधी मंजूर, पण प्रत्यक्ष काम सुरूच नाही!

अकोट: शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील रहिवाश्यांच्या सुरक्षेसाठी मागणी

केलेल्या थोपण भिंतीचे काम अद्याप सुरू झाले नाही.

यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्य

Related News

अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

प्रभाग क्रमांक 14 मधील महल्ले यांच्या घरापासून ते रहिवासी रघुनाथ रोकडे यांच्या घरापर्यंत थोपण

भिंत बांधण्याची मागणी नागरिकांनी पूर्वीच केली होती.

या कामासाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालेले नाही.

त्यामुळे संतप्त नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज अकोट

नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि तत्काळ काम

सुरू न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ आणि उपाध्यक्ष

लखन इंगळे यांनी केले. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला संगीता सरदार यांच्यासह

अनेक महिलांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला.

या ठिय्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून लवकरच

योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Related News