अकोट येथे रमजान ईद, राम नवमी आणि आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मॉब ड्रिल सराव

अकोट येथे रमजान ईद, राम नवमी आणि आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मॉब ड्रिल सराव

अकोट (प्रतिनिधी): आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या तयारीसाठी

अकोट येथे पोलीस विभागाच्या वतीने मॉब ड्रिल सराव आयोजित करण्यात आला.

पोपटखेड रोडवरील तालुका क्रीडा संकुल येथे हा सराव पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Related News

या सरावामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल,

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक किरण भोंडवे तसेच अकोट, दहिहांडा, हिवरखेड,

तेल्हारा येथील ठाणेदार आणि ६१ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

सरावादरम्यान, डि.आय. पवार आणि इंगळे यांनी गॅसगन, चिली स्प्रे, स्टन ग्रिनेड, टी.एस. ग्रिनेड,

डायमार्कर ग्रिनेडसह विविध सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली.

संभाव्य जमावबंदी परिस्थितीत कायदेशीर उपाय कसे अवलंबायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या सरावात विविध प्रकारचे सेल आणि ग्रिनेडचा वापर करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यात आली.

या सरावामुळे आगामी सण उत्सवांदरम्यान कायदा व सुव्यवस्था

राखण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related News