अकोट नगरपालिकेची चौपट करवाढ! नागरिकांमध्ये संतापाची लाट, कार्यालयात आक्षेप नोंदविण्यासाठी गर्दी

अकोट नगरपालिकेची चौपट करवाढ! नागरिकांमध्ये संतापाची लाट, कार्यालयात आक्षेप नोंदविण्यासाठी गर्दी

आकोट : शहरात नगर परिषदे अंतर्गत सन.2025-26 ते 2028-29 च्या प्रस्तावित चतुर्थ

वार्षिक कर मूल्यांकन सूचना ब-याच उशीराने प्राप्त होत आहेत. नोटीस वर 08/07/2025 दिनांक आहे.

आणि ही नोटीस नागरिकांना सुरु आठवड्यामध्ये प्राप्त होत आहेत. हरकती घेण्याची अंतिम तारीख दि.06/08/2025 आहे.

म्हणजे नागरीकांना “हरकती घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये”अशातला तर काही प्रकार नाही ना!

असा संशय येणे साहजिकच आहे. अकोट न.प.च्या नोटीसमध्ये कर आकारणी सुधारीत केली आहे.

असे म्हटले आहे. कर आकारणी मध्ये काही हरकती असल्यास दि.06/08/2025 पर्यंत हरकती सादर करण्याचे नगर परिषदेने म्हटले आहे.

कारणासहीत विधीग्राह्य लेखी आक्षेप अर्ज कार्यालयीन वेळेत स्विकारल्या जातील अशा नोटीस मध्ये उल्लेख आहे.

यामध्ये निवासी करपात्र प्रति चौ.मी.क्षेत्रफळाला रु.300 एवढा दर लावलेला आहे.

प्रथम मजल्यासाठीचा दर तर प्रति चौ.मी.रु.324 लावलेला आहे.

प्रति चौ.मी.चा दर अवाढव्य वाढविल्यामूळे वार्षिक भाडेमूल्य खुपच वाढलेले आहे.

तसेच जो दुरुस्ती खर्च निर्धारित केला आहे तो काय प्रकार आहे हे जनतेला स्पष्ट करुन सांगणे आवश्यक आहे.

अनेक लोकांच्या नोटीसमध्ये दुरुस्ती खर्च हजारो रुपये आहे.प्रत्येक निवासी आणि अनिवासी मालमत्तेचे करयोग्य मूल्य खुपच वाढलेले आहे.

करयोग्य मूल्याच्या 27% मालमत्ता कर लावलेला आहे.

कित्येक वर्षांपासून न.प. वृक्षकर वसूल करत आहे.

या नोटीसमध्ये करयोग्य मूल्याच्या 1% वृक्षकर लावलेला आहे.

न.प.अकोटने आतापर्यंत किती कोटी रुपये वृक्षकर वसूल केला.

या नोटीस मध्ये म.शिक्षण कर व वि.शिक्षण कर असे दोन कर दाखवलेले आहेत.

खुल्या प्लाॅटच्या करयोग्य मूल्यावर 27% कर लावलेला आहे.

ही अतिशय मनमानी झालेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अकोट नगरपालिकेकडे आक्षेप नोंदवलेला सुरुवात केलेली आहे.

वेळ कमी असल्यामुळे अकोट नगरपालिकेमध्ये प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे.

अकोट नगरपालिकेने एवढ्या अवाढव्य कर आकारणीचे कर शहरातील नागरिकांवर लादले असल्यामुळे शहरातील समस्त नागरिक या कराचा विरोध करीत आहे.

शहरात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. या करवाढी संदर्भात शहरातील राजकीय पक्ष,संघटना शासनाला निवेदने व मोर्चे काढून निषेध व्यक्त करीत आहेत.

नेमकं प्रशासन या संपूर्ण प्रकाराकडे काय निर्णय घेईल.

याकडे अकोट शहर व तालुक्यातील नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kidaniichya-azarana-public-strike/