विदर्भ, पुणे, कोल्हापूरसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

मुंबई/नागपूर (प्रतिनिधी)भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

आगामी २४ तासांत विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा,

गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर, तसेच पुणे, पंढरपूर, कोल्हापूर, रायगड,

नाशिक या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने पंढरपूर व परिसरातील नद्यांची पातळी वाढली आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढत असल्याने शेतीसाठी प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पुढील २४ तासांकडे लागले आहे.

नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-municipal-ripki-chaupat-karmadhyam-santapachi-lat-office-office/