अकोट – विद्यांचल द स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा

विद्यांचल द स्कूल

दि. २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी अकोट येथील विद्यांचल द स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला. या संस्मरणीय सोहळ्याचे आयोजन विद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजनासह केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते माया विवेकराव धुळे (नगराध्यक्षा, अकोट) आणि  नरेश भुतडा (अध्यक्ष, लक्ष्मीनारायण भुतडा फाऊंडेशन फॉर एज्युकेशन). सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी गीत आणि नृत्य सादरीकरण केले, तसेच सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संपूर्ण वर्षाचा आढावा मेंटर धनश्री बन्ने यांनी सादर केला, तर प्रमुख पाहुणे  सुमित कुमार यांनी मनोगत व्यक्त केले.

Related News

कार्यक्रमाचे व्यवस्थापन साक्षी नळे आणि  नेहा उकळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यांचल द स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

read also :  https://ajinkyabharat.com/akot-rotary-clubs-moffat-eye-examination-camp-804-eye-examination/

Related News