अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड

अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड

अकोला | ता. १७ एप्रिल

अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.

शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभागात

Related News

शिवसैनिकांनी जोरदार घागर आंदोलन केलं. या दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी विभागात घुसून तोडफोड केली,

खुर्च्या फेकल्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध नोंदवला.

सध्या अकोला शहराला पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

विशेषतः मलकापूर भागात पाणी मिळत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

या पाणी प्रश्नावरून आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या

कार्यकर्त्यांनी घागर मोर्चा काढत महापालिकेच्या जलप्रदाय विभागावर धडक दिली.

घोषणाबाजी करत शिवसैनिक विभागात घुसले आणि तिथे खुर्च्या, फर्निचर यांची तोडफोड केली.

मुख्य मागणी – दररोज पाणीपुरवठा

या आंदोलनामागची मुख्य मागणी म्हणजे मलकापूर भागात दररोज नियमित पाणीपुरवठा करणे.

मंगेश काळे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की, “नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी मिळणं ही त्यांची मूलभूत गरज आहे.

जर प्रशासन वेळेवर जागं झालं नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”


मंगेश काळे यांचा बाईट :

“पाणी ही गरज आहे, लक्झरी नाही! आम्ही वारंवार मागण्या करूनही प्रशासन झोपलेलं आहे.

आता आम्ही झोपवणार नाही. मलकापूरला दररोज पाणी मिळालंच पाहिजे!”

Read Also : https://ajinkyabharat.com/kolhaparat-football-samanyadrammanya-ayonatanana-pach-thousand-penalty-penalty/

Related News