अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;

अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा; माउंट कार्मेल चर्चमध्ये येशूच्या यातनांचे दृश्य साकारले

अकोला –

ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला

शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

Related News

येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण्यात आल्या, त्याचा

वास्तवदर्शी देखावा माउंट कार्मेल चर्चच्या आवारात उभारण्यात आला होता.

या दिवशी ख्रिश्चन बांधव उपवास करतात, चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांमध्ये सहभागी होतात

आणि येशूच्या बलिदानाची आठवण काढतात.

चर्चमध्ये येशूच्या जीवनातील अंतिम क्षणांचे दर्शन घडविणारा देखावा पाहून भाविकांचे डोळे पाणावले.

फादर जोसलीन यांनी येशूच्या त्यागामागील संदेश स्पष्ट करत सांगितले की,

“गुड फ्रायडे हे केवळ शोकाचे प्रतीक नसून, माणुसकी, क्षमा आणि विश्वशांतीचा संदेश देणारा दिवस आहे.”

यावेळी अकोल्यातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते.

मोठ्या संख्येने ख्रिश्चन समाजबांधवांनी सहभागी होऊन शांततेसाठी प्रार्थना केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/ek-mahinyachaya-chimurdichi-nirghrinpane-murder/

Related News