अकोल्यात चोरट्यांचा देवस्थानावर हल्ला

अकोल्यात चोरट्यांचा देवस्थानावर हल्ला; कुरणखेड चंडिका देवी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

अकोला :

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान

असलेल्या कुरणखेड येथील चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Related News

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेचा तपशील :

मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून तीन चोरटे मंदिरात घुसले.

त्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या उचलून सभागृहात नेल्या आणि तेथेच त्यातील रक्कम चोरली.

चोरी झालेली अचूक रक्कम अद्याप समजू शकलेली नाही.

भाविकांमध्ये संताप :

देवस्थानांवरच चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता आणि संताप व्यक्त केला जात आहे.

देवाच्या मंदिरात अशी चोरी होणं अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना भाविकांमध्ये आहे.

पोलिसांचा तपास सुरु :

घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/14-pakistani-yutube-chnelswar-bandi/

Related News