नवी दिल्ली :
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारताविरोधात खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करणाऱ्या १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
आज सोमवारी बंदी घालण्यात आली आहे. या यादीत डॉन न्यूज, समा टीव्ही,
जिओ न्यूज यांसारख्या प्रसिद्ध मीडिया संस्थांसह माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे.
सरकारची भूमिका :
सरकारचे म्हणणे आहे की, या चॅनेल्सद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षेला आणि सामाजिक
सलोख्याला धोका पोहोचवणारी माहिती पसरवली जात होती.
विशेषतः पहलगाम हल्ल्यानंतर या माध्यमांनी खोटे आणि भडकावू प्रचार सुरू केला होता, त्यामुळे कारवाई अनिवार्य ठरली.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क :
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी १५ ठिकाणी छापे टाकले असून, हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा शोध घेतला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात वापरासाठी दहशतवाद्यांनी चिनी ड्रोनचा वापर केला होता.
शस्त्रसंधी उल्लंघन :
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सलग चौथ्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. भारतीय लष्करानेही ठाम प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभेत निषेध ठराव मंजूर :
जम्मू-काश्मीर विधानसभेत सोमवारी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
या ठरावात शहीद सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली.
टीआरएफचा दावा :
दरम्यान, दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने भारतीय गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळवल्याचा दावा
करत टेलिग्राम चॅनेलवर पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी मोदी सरकारवर आणि गुप्तचर संस्थांवर आरोप करत नवीन खुलासे करण्याचा इशाराही दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallayanantar-pakistan-motha-motha-gondha/