अकोला: पत्नीवर गंभीर आरोप करून तलाठ्याची आत्महत्या – परिसरात खळबळ

अकोला: पत्नीवर गंभीर आरोप करून तलाठ्याची आत्महत्या – परिसरात खळबळ

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.

तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या

केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related News

एमआयडीसी परिसरात हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे.

तेलगोटे हे हिवरखेड (ता. तेल्हारा) येथे तलाठी म्हणून कार्यरत होते.

अत्यंत मनमिळावू आणि सर्वसामान्यांशी चांगले संबंध ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्याने अचानक

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पत्नीवर गंभीर आरोप

आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारे त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले होते.

मात्र, त्यांनी नेमके कोणते आरोप केले आणि आत्महत्येचे खरे कारण काय आहे,

याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या घटनेचा तपास सुरू आहे.

तलाठ्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय? पत्नीवर केलेले आरोप कितपत सत्य आहेत?

हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होईल.

Related News