अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला,
काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
हवामान खात्यातर्फे अकोला शहरात १४०.७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
असून अकोला शहरात काल अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले आहे,
याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यात जसे अकोट तालुक्यात 58.9 मिमी,
तेल्हारा तालुक्यात 39.9 मिमी, बाळापूर तालुक्यात 56.7 मिमी,
पातूर तालुक्यात 55.6मिमी, अकोला तालुक्यात 49.9मिमी,
बार्शीटाकळी तालुक्यात 31.1 मिमी तर मूर्तिजापूर तालुक्यात 41.7मिमी नोंद करण्यात आली.
असून संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री 48.2 मिलिमीटर पाऊस पडण्याची माहिती नैसर्गिक
आपत्ती विभागात दिली आहे. काल झालेल्या पावसामुळे अकोल्या जिल्ह्यातील 1132 हेक्टर
पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला तालुक्यातील 34 गावात 286 हेक्टर पीक, बार्शीटाकळी तालुक्यातील 9 गावातील 35
हेक्टर, बाळापूर तालुक्यातील 37 गावात 250 हेक्टर तर सर्वाधिक पातूर तालुक्यातील
27 गावात 561 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे, यामध्ये कांदा, भुईमुंग, ज्वारी,
निंबु, केळी, मका तसेच तीळ पीक समाविष्ट असून आणखीन काही
तालुक्यात शेती नुकसान संदर्भात सर्वेक्षण चे काम सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyamidhye-kaal-musadhar-paus-jhalyane-geeta-nagar-madil-gharache-motha-damage/