अकोला, प्रतिनिधी | अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात एका
२५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे.
संतोष वनवासे (वय २५, मूळ रहिवासी उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
तो अकोला शहरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करीत होता.
गाडी घसरून पुलाच्या भिंतीला धडक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वनवासे यांची दुचाकी अचानक घसरली आणि
पुलाच्या कडेला असलेल्या भिंतीला जोरदार धडकली. धडकेनंतर त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला,
आणि काही क्षणांतच त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल
होऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरु असून,
अत्यधिक वेग, रस्त्याची अवस्था किंवा तांत्रिक बिघाड या कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, याचा शोध घेण्यात येत आहे.
अकोल्यातील नवीन उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच असल्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jhansi-dj-vajavaliya-vadatun-gondha/