अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे

श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडलीय.. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा

मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे ‘गाडपगार’ एकाच वेळी पाच

बैलगाड्या ओढण्याची अनोखी व ऐतिहासिक परंपरा.. महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवास करतात.

Related News

व यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो,

या बैलगाड्यांमध्ये सुमारे १०० ते १५० लोक बसतात..या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात..

यात्रे निम्मित संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो..या यात्रेत कोणताही जातभेद न ठेवता

सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार ओढतात हे विशेष..

या यात्रेनिमित्त अकोला , अमरावती , वाशिम जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात..

Related News