१० लाखांचे बक्षीस..
एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ”
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अमरावती प्रदेशात ‘अ’ वर्गामध्ये
अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा (अकोला आगार क्र. २) प्रथम क्रमांक आला असून,
या बसस्थानकाला १० लाख रुपयांच बक्षीस मिळाले आहे.
मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून
१ मे, २०२३ ते ३० एप्रिल, २०२४ या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबविले गेले.
ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून,
या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून
अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते.
पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले.
यामध्ये अमरावती प्रदेशात ‘अ’ वर्गामध्ये’ ७० गुण मिळविणाऱ्या
अकोला मध्यवर्ती बसस्थानकाने पहिला क्रमांक पटकावला.
येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व
बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा,
वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट,
ही कामे करण्यात आली.
या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा- सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच
त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून
वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले.
या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा बसस्थानकाचा
अमरावती प्रदेशात तिसरा क्रमांक आला आहे.
या बसस्थानकाला १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-prabhat-pheri-on-the-occasion-of-social-justice-day/