अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
Related News
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून, १०० दिवस उलटूनही
राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी
मध्यरात्री मशाल आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं प्रहार कार्यकर्त्यांनी सांगितलं.
यावेळी सरकारकडून लवकरच कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतला जाईल,
असं आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिलं.
आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.