वीज बिलाच्या वसूलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. अकोला परिमंडळात एकूण २८० कोटी रूपयांची थकबाकी असून, त्यातील फक्त ८५ कोटी रूपये वसूल झाले आहेत. त्यामुळे वीज थकबाकी शुन्य करण्यासाठी महावितरणने सामुहिक वसूली मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावक यांच्या पुढाकाराने मेहकर विभागातील शेलगावात कारवाई करण्यात आली. यावेळी थकबाकीदार ३८ वीज ग्राहकांचे मीटर काढले गेले. या ग्राहकांचा वीज पुरवठा फक्त संपूर्ण थकबाकी, सुरक्षा ठेव व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच जोडला जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.
“मिशन ९० दिवस” अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचे चालू बिल आणि जानेवारी पर्यंतची थकबाकी वसूल करणे महावितरणचे उद्दिष्ट आहे. यासाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी प्रत्येक कर्मचारी वसूलीसाठी बाहेर काढण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला वीज बिल वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Related News
Bank Strike : ग्राहकांनो सावधान! आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद; कर्मचारी संपावर, गणेशोत्सवापूर्वी व्यवहारांवर परिणाम
Bank Strike : देशभरातील सरकारी बँक कर्मचारी आजपासून ...
Continue reading
पुसद | तालुका प्रतिनिधी – कुलदिप सुरोशे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर; 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, विदर्भात रेड अलर्ट
महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुस...
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम ठेवण्याची जोरदार मागणी कर...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी...
Continue reading
अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 10 हजारांच्या लाचप्रकरणी अटक. जळगावातील घरातून तब्बल 2.94 कोटींची रोकड, सोने आणि कागदपत्रे जप्त.
10 हजारांच्या लाचेपायी क्लास-1 अ...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. 2026-27 कृती आ...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनकाटा आणि पारदर्शक निविदा प्...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 24 व 25 जून 2026 रो...
Continue reading
परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही; NEET पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करा : पॅक्टोची मागणी
देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या NEET-UG 2026 प...
Continue reading
महावितरणने स्पष्ट केले की, वीज बिल भरले नाही तर पुरवठा थांबवला जाईल. सामुहिक मोहीमेच्या वेळी विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचेही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अकोला परिमंडळातील २८० कोटी रूपयांच्या थकबाकीत घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गातील ग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यांनुसार थकबाकी अशी आहे: अकोला जिल्हा – ११५ कोटी ७४ लाख, बुलडाणा – १४४ कोटी, वाशिम – ५१ कोटी ६५ लाख. यापैकी अनुक्रमे ४० कोटी, ३२ कोटी आणि १३ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत.
महावितरणची ही कारवाई वीज थकबाकी शून्य करण्यासाठी निर्णायक पाऊल असून, ग्राहकांना वेळेत बिल भरण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.
read also : https://ajinkyabharat.com/greetings-from-mahavitaran-to-saint-gadge-maharaj/