‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताचं पाकिस्तानला तडाखेबंद
नवी दिल्ली :‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी भारतावर ड्रोन हल्ल्यांचं धोरण राबवलं. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर आणि पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे सर्व ड्रोन हवेतच निष्क्रीय केल्याची माहिती आहे.
ड्रोन हल्ल्यांनंतर भारताचा जोरदार प्रतिहल्ला
पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर भारताने तत्काळ कारवाई करत इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इस्लामाबादमध्ये मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकू आला असून शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. लाहोर व कराचीसह पाकव्याप्त काश्मीरमध्येही ब्लॅकआऊट झालं आहे.
INS विक्रांतवरून कराची बंदरावर हल्ला
भारतीय नौदलानेही समुद्रातून हल्ला करत कराची बंदरावर लक्ष्य केलं आहे. INS विक्रांतवरून सुरू करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये कराची बंदरावर १० हून अधिक स्फोट झाल्याचं वृत्त आहे. परिणामी कराचीमध्ये मोठा गोंधळ आणि भीती निर्माण झाली आहे.
ड्रोन हल्ल्यांची ठिकाणं आणि भारतीय प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचे लक्ष्य जम्मू विमानतळ, रेल्वे स्थानक, चन्नी हिम्मत आणि सीमावर्ती आरएस पुरा हे होते. भारताने S-400 प्रणाली सक्रिय करत सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले. आकाशातून येणारे लाल रंगाचे गोळे म्हणजेच क्षेपणास्त्रांचं लक्ष्यही निष्फळ ठरवलं गेलं.
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला

08
May