अखेर सांबा उपविभागाचे शाखा अभियंता आंदोलकांच्या भेटीला!

अजिंक्य

अजिंक्य भारत Impact! 

बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या

ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.

Related News

रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत

कालपासून आंदोलन सुरू केल होत.

जोपर्यंत संबंधित अधिकारी लेखी देत नाहीत

तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूर्तीजपुर चे शाखा अभियंता

यांनी आज दुपारी सदर आंदोलनाला भेट देऊन

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांना लेखी आश्वासनाचे पत्र दिले.

त्यात महान पिंजर धाबा राजनखेड पातूर रस्ता २२ किमी २२/०० ते २७/०० च्या

कामाची वनविभागाकडून नाहरकत प्राप्त झाली आहे,

तसेच प्रजिमा २२ किमी १७/०० ते २२/०० ची वनविभागाकडून नाहरकत प्राप्त होताच

ते काम हाती घेण्यात येईल. सदर नाहरकत बाबत

वनविभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

काल जानुना येथे झालेल्या आंदोलनाचे वृत्त दैनिक अजिंक्य भारत ने प्रकाशित केले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/januna-villagers-are-planting-themselves-in-the-ground-for-roads-and-banana-movement/

 

Related News