उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या
दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक
केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी
Related News
काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी
अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट
आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत
असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत
नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा
खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी तिरोडा येथे आयोजित
कार्यक्रमात लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने
शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी
जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. यावेळी तिरोडा येथे आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव
स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्यापूर्वीच काही अज्ञात
व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की
निश्चितपणाने या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे
मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत.
आमच्या पक्ष या ठिकाणी वाढतो त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर
फाडले असतील त्यांचा मी निषेध करतो असे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/sonya-chandila-punha-jhalaali/
