अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार

अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार

अहमदाबाद –

शहरातील खोखरा परिसरात एका उंच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक

कुकरमुळे अचानक आग लागली. या आगीत दाट धूर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरला होता.

Related News

या दरम्यान, चौथ्या मजल्यावर अडकलेले १८ रहिवासी जीवाच्या भीतीने घाबरून गेले.

मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसी कामगिरी करत सर्व १८ जणांना सुखरूप वाचवलं.

संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचं थरारक दृश्य पाहून अंगावर शहारे येतील असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच मणिनगर अग्निशमन केंद्राचे तीन फायर इंजिन आणि एक हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मसह

सात ब्रिगेडची वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

सुरुवातीस स्थानिक नागरिकांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

एक लहान मुलगी थोडक्यात खाली पडण्यापासून वाचली.

काही रहिवासी बचावासाठी छताकडे धावत गेले होते.

दरम्यान, गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी स्वतः

घटनास्थळी हजर राहून बचाव कार्याचे निरीक्षण केले.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता.

धूर पसरल्याने पायऱ्या अंधारलेल्या होत्या, त्यामुळे बचाव कार्य अधिक कठीण बनलं होतं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी आग नियंत्रणात आणली, आणि मग ओले टॉवेल तोंडावर गुंडाळून लोकांना सुरक्षित खाली आणलं.

Related News