मुंबई : विराट कोहलीचा स्ट्राइक रेट हा सध्याच्या घडीला चिंतेचा विषय ठरला आहे. कारण कोहली मोठी खेळी साकारतो, पण जास्त चेंडू त्यासाठी वापरतो. त्यामुळे कोहलीवर आयपीएल सुरु असताना जोरदार टीका केली जात आहे. पण तरीही त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर कोहलीच्या या स्ट्राइक रेटबद्दल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अखेर मौन सोडले आहे.
विराट कोहलीने आयापर्यंतच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आरसीबीकडून तो एकटाच दमदार फलंदाजी करताना दिसतो. विराटने या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकंही झळकावली आहेत. पण आयपीएलमध्ये जिथे खेळाडू ४०-४५ चेंडूंमध्ये शतक झळकावताना दिसली तिथे कोहली शतकासाठी ६० चेंंडूं घेताना दिसला, त्यामुळेच त्याच्यावर टीका केली जात आहे.
कोहलीबाबत अगरकर म्हणाले की, ” विराट कोहली हा एक अनुभवी क्रिकेटपटू आहे. सध्याचा आयपीएलमध्ये तो भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याच्या स्ट्राइक रेटबाबत मात्र आम्ही चर्चा केली नाही. कोहलीच्या निवडीबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही.” कोहलीकडे अनुभव एवढा जास्त आहे की, त्याच्या स्ट्राइक रेटची चर्चा त्याला टी-२० संघात स्थान देताना झाली नसल्याचे आता आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोहलीचा स्ट्राइक रेट हा काही मोठा मुद्दा नसल्याचे निवड समितीला वाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Related News
IND vs ENG ODI Series : धक्कादायक! भारताविरुद्ध इंग्लंडचा 'हा' खेळाडू तिन्ही वनडेत NOT OUT; 249 धावांनी मालिकेचा खरा गेमचेंजर
मुंबई : भारत आणि इंग्...
Continue reading
इंग्लंडविरुद्ध 138 धावांची शानदार खेळी केल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीच्या चर्चांवर प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली. 'माझं एकच काम चांगली फलंदाजी करण...
Continue reading
Harsh Goenka यांच्या 'RoKo' पोस्टमुळे रोहित शर्मा, विराट कोहली, गौतम गंभीर, अजित अगरकर आणि जय शाह यांच्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. रोहितच्या निव...
Continue reading
IND vs ENG 3rd ODI मध्ये भारताच्या Playing XI मध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर असून केएल राहुल, अर्शदीप...
Continue reading
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघात 2 मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना संधी मिळू शकते. जाणून घ...
Continue reading
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये 1 मोठा बदल झाला आहे.
Continue reading
विराट कोहली News : सलग 2 शून्यांनंतर विराटचा जबरदस्त कमबॅक, अभिषेक नायरांनी सांगितला खास किस्सासलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर विराट ...
Continue reading
IND vs ENG 1st ODI : 125 धावांचे वादळी शतक झळकवूनही ईशान किशन Playing 11 मधून बाहेर; जाणून घ्या 5 मोठी कारणे
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्य...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 4-0 ने व्हाईटवॉश झाल्यानंतर माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या संघनिवडीवर गंभीर प्रश्न उपस्थित...
Continue reading
IND vs ENG यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचे पु...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडिया बर्मिंगहॅममध्ये फिरताना दिसली. रोहित शर्माला पाहताच चाहत्यांनी सेल्फीसाठी मोठी गर्दी केली. श्रेयस ...
Continue reading
IND vs ENG 1st ODI मध्ये रोहित शर्मासमोर तीन मोठे ऐतिहासिक विक्रम रचण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके, भारताचा नंबर-1 सलामीवीर आणि 39 व्...
Continue reading
कोहली धावा करत असला तरी त्याच्यापेक्षा अन्य खेळाडू हे जलदगतीने धावा करताना दिसतात. जिथे कोहलीला एका सामन्यात ६० धावा करण्यासाठी ४० चेंडू लागले होते, तिथे रजत पाटीदारने २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.त्यामुळे कोहलीवर टीका होताना दिसत आहे. आता तर कोहलीकडे ऑरेंज कॅपही राहिेलेली नाही. कारण ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप कोहलीकडून हिसकावत आपल्या नावावर केली आहे.
विराट हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याचा फायदा भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कपमध्ये होईल, असे भारताच्या निवड समितीला वाटत आहे.