अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक

अचूक नियोजन

अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक

अकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी जनगणनाविषयक तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ आज नियोजनभवनात झाला. जनगणना कक्षाचा शुभारंभही यावेळी झाला.

विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक जनगणना महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने अचूक नोंदी घेणे आवश्यक आहे. संकलनातून कोणतीही माहिती सुटता कामा नये, तसेच कुठल्याही नोंदीची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी केले.
प्रशिक्षणातून जनगणना प्रक्रियेची प्रत्येक तरतूद समजून घेऊन त्यानुसार परिपूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Related News

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,सहायक संचालक (जनगणना) प्रवीण भगत, ऋषीकेश पाठारे, जिल्हा प्रशिक्षक वैभव फरतारे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचाही शुभारंभ आज झाला. या कक्षाद्वारे जनगणना प्रक्रियेचे सनियंत्रण व समन्वयन केले जाणार आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/palghar-news-tarapur-midc-punha-hadarli-silent-killer-gas-leak-in-aarti-pharma-lab-many-workers-disrupted/

Related News