Ashok Ma.Ma Marathi Serial Track: भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता,
आणि आता या लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Ashok Ma.Ma Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi)
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अशोक मा.मा. (Ashok Ma.Ma) मालिकेत सध्या बऱ्याच घटना घडत आहेत.
अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरू असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी यासगळ्यात
मामा मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेत आहेत. त्यात भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत.
आता त्यातच अनिश आणि भैरवीनं अचानक लग्न केल्यानं मामांना मोठा धक्का बसला.
भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता, आणि आता या लग्नामुळे
घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अशोक मामा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना, हे नवं वादळ त्यांच्यासाठी अजून एक मोठं संकट ठरणार का?
हा मोठा प्रश्न आहे. भैरवीचा गृहप्रवेश ठरेल का अशोक मा. मांसाठी संकटाची नांदी?
जाणून घेण्यासाठी रविवारचा मालिकेचा विशेष भाग पाहावा लागणार आहे.
परशूरामनं आधीच भैरवीविषयी संशय व्यक्त केला होता, आणि त्याच्या संशयावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
फुलराणीनं परशूराम आणि भैरवीचे फोटो काढून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवलं होतं.
त्याच वेळी संयमीनं घरात खोटं बोलून विश्वासघात केल्याचंही उघड झालं. पण या सगळ्याचा कळस
म्हणजे अनिशनं भैरवीसोबत लग्न करून आल्याची बातमी असणारा आहे. मामांनी आधीच घर विकण्याचा विचार सुरू केला होता,
आणि आता भैरवी घरात आली, तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता आहे. भैरवीच्या उपस्थितीमुळे कुटुंबात फूट पडणार का?
अनिशच्या या निर्णयानं तो स्वतः अडचणीत सापडणार का?
भैरवीला घरात प्रवेश द्यायचा की नाही, यावर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. मामा भैरवीला घरात येण्यासाठी परवानगी देतील?
अनिशच्या निर्णयामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्याच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेत
भैरवी कुटुंबावर वर्चस्व मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/bandist-kacha-ekshit-executive-naradham-dattatraya-gadenam-shivshahi-basch-nivdali/