शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना
शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे,
फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
Related News
कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड परिसरात भाजप कार्यकर्ता सूरज साखरे याच्यावर भरदिवसा तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी असून...
Continue reading
ISRO Crisis : 120 शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांनी इस्रोमध्ये खळबळ; गगनयान मिशनवर संकट, सरकारचा मोठा निर्णय
बंगळुरू : भारताला अंतराळ क्षेत्रात जागति...
Continue reading
बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्याने 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. UNHCR आणि IOM ...
Continue reading
स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाचा चिनी कॉमेडियनने एका साध्या प्रश्नातून खोटेपणा उघड केला. व्हायरल व्हिडीओमुळे...
Continue reading
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर कोठारे यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. स...
Continue reading
पुण्यात एक्स्पायरी डेट उलटलेले चीज विकणे आणि पनीर व शॅम्पूवर MRP पेक्षा जास्त पैसे आकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने रिलायन्स रिटेलला दोषी ठरवत ग्राहकाला 30 ह...
Continue reading
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांच्या चर्चांवरही आली मोठी अपडेट
महाराष्ट्र सरकारच्या म...
Continue reading
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपणार! आता कनेक्शनशिवाय मिळणार सिलिंडर, 5 मिनिटांत घरपोच सेवा सुरू
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग करणे, न...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना
ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन
मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं असताना आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मला असं वाटतं की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत,
विशेषत: जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना वारवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत,
किंवा ते तशाप्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत,
तशा कमेंट करणं योग्य नाहीये, त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही,
असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे, यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिली गोष्ट माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार
हा मुख्यमंत्र्यांनाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात, आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात.
मी कॅबिनेटमध्येच स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्हाला जी नावं पाहिजे ती तुम्ही पाठवा. पण ज्या नावामध्ये ज्यांची
नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांमध्ये समावेश आहे, त्यांच्या नावांना मी परवानगी देणार नाही.
आतापर्यंत माझ्याकडे 125 जणांची नावं आली, त्यातील 109 नाव मी क्लिअर केली आहेत, उर्वरीत नावांना परवानगी दिली नाही,
कारण त्यांच्यावर कुठला न कुठला आरोप आहे, त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही
मी अशा लोकांच्या नावाला मान्यता देणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/juna-kirana-bazar-income-tax-department-action-paan-masala-betel-sea-soluble-dhad/