पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण
करणाऱ्या गजा मारणे टोळीतील गुंडांवर मोका लावण्यात आलाय.
त्यासोबतच गजा मारणेवरही कारवाई
करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या पुण्याची ओळख काहीशी बदलली आहे. गेल्य काही दिवसांपासून पुण्यामध्ये
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.
आता १९ फेब्रुवारीला कोथरूडमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील
मुलाला मारहाण झाली होती. कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीमधील गुंडांना तरूणाला मारहाण केली होती.
या प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांनी थेट पोलिसांनाच इशारा दिला होता.
अशातच पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कारवाई केली असून मोठी अपडेट समोर आली आहे.
देवेंद्र जोग मारहाण प्रकरणामधील अटक केलेल्या तीन आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
त्यासोबतच मारणे टोळीला मोका लावला असून टोळीला नेस्तानाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे.
एकूण 27 आरोपी आमच्या रडावर असल्याची माहिती समजत आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीतील गुंडांची माहिती मागवून घेतली आहे.
देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात सुरवातीला झालेल्या तपासाच्या सुरूवातीच्या काळातील कारवाईच्या बाबतीत मी नाराज.
आता गुन्हेगारांनी छोटीशी चूक जरी केली तर सोडलं जाणार नाही.
कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर करून
त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओ कडून मागवली आहे. काही गुन्हेगार पुण्याबाहेर जाऊन गुन्हे करत आहेत.
त्यांच्यावर देखील आमच लक्ष असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.
अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ अशी अटक आरोपींची नावे आहेत.
अटक केलेल्या आरोपींना पुणे पोलिसांनी हिसका दाखवला. पोलिसांनी गेल्या वर्षी सर्व आरोपींची ओळख परेड घेतली होती,
त्यावेळी सर्वांना तंबी देण्यात आली होती. सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण होईल अशी कोणतीही पोस्ट करायची नाही,
मात्र इन्स्टाग्रामवर गजा मारणेचे पुण्याचे मालक म्हणून अनेक रिल्स अजूनही पोस्ट केले जात आहेत.
Read more news here