Share Market : आज सोमवारी शेअर बाजार लाल निशाणीसह उघडला.
शेअर बाजारावर पुन्हा एकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या धमकीचा परिणाम दिसून आला.
काही मनिटात निफ्टीने सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल टाकत घसरण नोंदवली.शेअर बाजारातील पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीय.
Related News
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली.
आज सोमवारी शेअर बाजार लाल निशाणीसह उघडला. मुंबई शेअर बाजाराचा 30
शेअर्सचा सेंसेक्स बाजार उघडताच 500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. निफ्टी 159 अंक घसरणीसह उघडला.
सुरुवातीच्या सत्रातच लार्जकॅपमधील 30 पैकी 29 शेअर्सची सुरुवात घसरणीसह झाली.
सर्वात जास्त घसरण Zomato च्या शेअर्समध्ये दिसून आली. शेअर बाजारावर पुन्हा एकदा
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या धमकीचा परिणाम दिसून आला.
BSE सेन्सेक्स मागच्या आठवड्यात 75,311.06 अंकावर बंद झालेला. सोमवारी तो घसरणीसह 74,893.45 अंकांवर उघडला.
काहीवेळात घसरण वाढली. सेन्सेक्स कोसळून 74,730 या स्तरावर पोहोचला.
दुसऱ्याबाजूला निफ्टी मागच्या आठवड्यात 22,795.90 अंकांवर बंद झालेला.
तो 22,609.35 च्या लेवलवर ओपन झाला. काही मनिटात निफ्टीने सेन्सेक्सच्या
पावलावर पाऊल टाकत 200 अंकांच्या घसरणीसह 22,607 पर्यंत घसरला.
किती लाख कोटींचा फटका?
शेअर बाजारात घसरणं इतकी वेगात झाली की, 5 मिनिटात BSE मधील लिस्टेड कंपन्यांच्या एकूण
मार्केट कॅपमध्ये 3.40 लाख कोटी रुपयाची घट झाली. ग्लोबल मार्केटमध्ये घसरण सुरु असताना आता
ब्रॉडर मार्केटमध्येही अस्थिरतेची स्थिती आहे. BSE चे सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाणीवर व्यवहार करत आहेत.
सकाळी 9.20 मिनिटांनी BSE मधील लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप कमी होऊन 3.40 लाख कोटी रुपयांवर आली.
गुंतवणूकदारांची नजर कशावर असेल?
ट्रम्प टॅरिफ आणि ग्लोबल बाजाराच्या स्थितीशिवाय गुंतवणूकदारांची नजर काही महत्त्वाच्या
आर्थिक आकड्यांवर आहे. जे बाजाराची दशा आणि दिशा ठरवतील. दोन दिवसांनी 26 फेब्रुवारीला
अमेरिकेत होम सेल्सचा डाटा जारी होणार आहे. 27 फेब्रुवारीला अमेरिकेत GDP ग्रोथचा अंदाज लावला जाईल.
28 फेब्रुवारीला भारत सरकार चालू वित्त वर्ष (2024-25) ची तिसऱ्या तिमाहीसाठी GDP डेटा
आणि आगामी आर्थिक वर्षासाठी GDP चा अंदाज जाहीर करेल. या आकड्यांवर गुंतवणूकदारांची नजर असेल.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akotat-ripai-and-gatacha-sakriti-vivid-maganyananasathi-grand-front/