Manoj Jarange Patil समोर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, “फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी”

Manoj Jarange Patil

“तर मी फाशी घेईल…”;Manoj Jarange Patil समोर आशिमा मित्तल यांच्या वक्तव्याने अंतरवाली सराटीत क्षणभर शांतता

Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना प्रशासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत भावनिक क्षण; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये खळबळ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते Manoj Jarange Patil   यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असताना Manoj Jarange Patil  यांची प्रकृती खालावत असल्याने प्रशासन आणि सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये काही क्षणांसाठी शांतता पसरली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, विविध मागण्या मान्य कराव्यात आणि सरकारने ठोस निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सरकारकडून जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Manoj Jarange Patil  यांनी सरकारसमोर आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तसेच १२ सप्टेंबर रोजी मुंबईकडे जाण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मराठा समाजातील तरुणांनी टप्प्याटप्प्याने मुंबईकडे रवाना व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, आझाद मैदानावर कोणीही जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related News

अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अंतरवालीत

Manoj Jarange Patil  यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. त्यानंतर जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचले.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारकडून आतापर्यंत कोणकोणत्या पातळीवर कार्यवाही करण्यात आली आहे, याची माहिती जरांगे पाटील यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीवर जरांगे पाटील समाधानी नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.

चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना सरकारची बाजू मांडण्याबाबत प्रश्न केला. “तुम्ही सरकारची बाजू घ्यायला इथे आला आहात का?” असा सवाल त्यांनी केला. त्यावर आशिमा मित्तल यांनी “ते माझे काम आहे,” असे उत्तर दिल्याचे समोर आले.

Manoj Jarange Patil  च्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ?

यानंतर सरकारवर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी, सरकारच्या धोरणांमुळे अनेक चांगल्या लोकांवर फाशी घेण्याची वेळ येते, अशा आशयाचे वक्तव्य केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेत आशिमा मित्तल यांनी प्रतिक्रिया दिली.

“मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,” अशा आशयाचे वक्तव्य आशिमा मित्तल यांनी केल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी मित्तल यांचे हे वक्तव्य ऐकताच अंतरवाली सराटीतील वातावरण काही क्षणांसाठी गंभीर झाले. उपस्थितांमध्येही शांतता पसरली.

मित्तल पुढे बोलत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना थांबवले आणि आपला मुद्दा स्पष्ट करण्यास सुरुवात केली.

“तुम्ही जिल्हाधिकारी आहात, फाशीची भाषा बोलू नका”

आशिमा मित्तल यांच्या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांना समजावत म्हटले की, “तुम्ही जिल्हाधिकारी आहात… तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका. एक प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होईल.”

पुढे जरांगे पाटील यांनी, “मी काय बोलतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही कशाला या भानगडीत पडत आहात?” असे म्हणत मित्तल यांना या विषयात भावनिक होऊ नये, असे सांगितले.

जरांगे पाटील यांनी यावेळी आशिमा मित्तल यांच्या शिक्षणाचा आणि प्रशासकीय सेवेत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख केला. “तुम्ही अभ्यास करून मोठी झालेली लेकरं आहात,” असे म्हणत त्यांनी त्यांना धीर दिला.

“तुमची UPSC-MPSCची पुस्तके त्यांना वाचता येणार नाहीत”

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा उल्लेख करत सरकारवरही टीका केली. “तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून इथपर्यंत पोहोचले आहात. तुमची UPSC आणि MPSCची पुस्तके यांना वाचता येणार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

जरांगे पाटील यांच्या या वक्तव्याचा रोख सरकारमधील काही मंत्र्यांकडे असल्याचे त्यांच्या पुढील वक्तव्यावरून स्पष्ट झाले. “सरकारमध्ये चौथी नापास लोक मंत्री आहेत. ते लोक तुम्हाला शिकवून इकडे पाठवत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

या संपूर्ण चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असल्याने जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून पुढील काळात कोणता निर्णय घेतला जातो आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

Read Also :  https://ajinkyabharat.com/ganeshotsav-2026/

Related News