बुंद से गयी, वो हौदसे नही आती, धसांना राऊतांचा सूचक टोला, म्हणाले त्यांचा बुरखा…

बुंद से गयी, वो हौदसे नही आती, धसांना राऊतांचा सूचक टोला, म्हणाले त्यांचा बुरखा…

मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यावर चोहो बाजूनी एकच हल्लाबोल झाला.

यापूर्वी त्यांनी डील केल्याचा संशय व्यक्त करणारे संजय राऊत यांनी पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस चांगलेच ट्रोल झाले.

Related News

एकदा रुग्णालयात ते मुंडे यांना भेटले. तर दुसऱ्यांदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या

मध्यस्थीने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच लांबलचक बैठक झाली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नाही.

पण धस चांगलेच अडचणीत आले. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरण, घोटाळ्यात

अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर

संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत अजित पवार यांच्या पक्षावर आणि मंत्र्यांवर गरजले.

दोन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे.

माणिक कोकाटे यांच्या नाव न घेता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका मंत्र्याला कोर्टाने शिक्षा ठोठावली, असे ते म्हणाले.

त्यामुळे येते अधिवेशन वादळी असेल. सभागृह चालेल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर असल्याचे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष निष्पक्ष नसल्याचा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला.

40 आमदारांच्या प्रकरणात, त्यांचे चारित्र्य समोर आल्याचे राऊत म्हणाले.

अंजली दमानिया, सुरेश धस हे कृषी खात्यापासून इतर भ्रष्टाचाराची प्रकरणं, घोटाळे बाहेर काढत आहेत.

पण नैतिकतेच्या मुद्दावर ही ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. अजित पवार यांनी नाही तर

मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे, असे त्यांनी ठणकावले.

त्यांचा बुरखा फाटला

सुरेश धस यांच्या आरोपांवर राऊतांना चांगलेच तोंडसुख घेतले. आता धस यांच्यावर कोणी विश्वास ठेवेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.

तरीही ते मैदानात असल्याचे भासवत आहेत. ते मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. ठीक आहे.

ते चांगले नाटक वठवत असल्याचा चिमटा राऊतांनी त्यांना काढला.

धस यांचा बुरखा फाटल्याचा टोला त्यांनी लगावला. बुंद से गयी, वो हौदसे नही आती, असा मार्मिक टोला त्यांनी धसाला लगावला.

त्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यांना अंधारात ठेवून भेटीचे नाट्य घडले असेल.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/shiv-jayantinimitta-telharat-2169-raktadatyancha-shivasankalp-complete/

 

Related News