अकोट: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वसुंधरा इंग्लिश
हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली.
या सोहळ्याची सुरुवात इशिता रामेकरच्या शिवगर्जनेसह शिवरायांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली.
Related News
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित कविता गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
तसेच, शिवरायांचे शौर्य, पराक्रम, निष्ठा, सर्वधर्म समभाव,
दूरदृष्टी आणि संयमशीलता यावर विद्यार्थ्यांनी भाषणांमधून प्रकाश टाकला.
प्रमुख अतिथी आणि मान्यवर उपस्थित
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवचरण नारे, शिक्षिका राधिका कुलट,
पालक प्रतिनिधी विठ्ठल पांडे, प्रशांत वाघ आणि प्रमुख अतिथी प्रज्ञा पुंडकर उपस्थित होते.
त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील मूल्ये आपण अंगीकारली पाहिजेत, असे विचार मांडले.
शालेय विद्यार्थ्यांनी घेतले नेतृत्व
कार्यक्रमाचे सुंदर संचालन वर्ग ८ चे विद्यार्थी रीशांत राऊत व दीप सोनी यांनी केले,
तर अथर्व वाडेकरने आभार प्रदर्शन मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांचे परिश्रम
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय वाकळे, शीतल फोकमारे, अक्षय काळे,
नंदकिशोर इंगळे, रवींद्र भावणे, माधुरी झटाले, छाया बनकर, पुष्पा खोडके,
वैशाली हिंगणकर, संजीवनी लोणे, स्मिता नायसे, गिरीश ढगेकर, प्रिया गोतमारे,
रूपाली उबाळे, श्रमिका झामरे, इंद्रावती पाचडे, वृषाली वानखडे, प्रियंका पांडे,
सुश्मिता शिवरकर, कोमल दसोडे, मंगेश सपकाळ, प्रशांत उबाळे, वसंत मोहोड,
निळकंठ पुंडकर, यमुना डिगोळे आणि समीक्षा जुनगरे यांनी परिश्रम घेतले.
या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्र आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा निर्माण केली.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/diabetic-aani-hridayache-arogya-both-of-them-together/