अभिजीत दिपकेंची तब्येत अचानक बिघडली; मळमळ, उलट्या आणि लो बीपीचा त्रास, डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आजारी; नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अचानक त्यांची तब्येत बिघडली. समर्थकांसोबत संवाद साधत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना मळमळ, उलटी आणि घबराटीचा त्रास जाणवू लागला. यासोबतच त्यांचा रक्तदाब (BP) देखील कमी झाला होता.
प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी अभिजीत दिपके यांची तपासणी केली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
समर्थकांशी बोलताना अचानक जाणवला त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे 11.45 वाजण्याच्या सुमारास अभिजीत दिपके हे आपल्या निवासस्थानी आलेल्या समर्थकांशी चर्चा करत होते. यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घबराट जाणवली आणि मळमळ होऊ लागली.
Related News
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत शिंदे गटाचा ‘हुकूमी एक्का’; नीरज कौल यांनी थेट कार्यकर्त्यांच्या भावनेला घातला हात
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? ‘पक्षप्रमुख’ पदावर शिंदे गटाचा मोठा दावा; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
2008 सारख्या आर्थिक संकटाची चाहूल? अमेरिकेतील ‘हा’ बदल भारतासाठी ठरणार धोक्याची घंटा
उपवासाला चहा प्यावा की कॉफी? जाणून घ्या शरीरासाठी कोणता पर्याय ठरतो फायदेशीर
17 खासदारांना भाजपचा मोठा झटका; पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम, दिल्लीत खळबळ
भारतावर पुन्हा मोठं संकट! महत्त्वाच्या तेलवाहिनीवर हल्ला; पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता
PF खात्यातून कर्ज मिळते का? EPFO चा नियम काय सांगतो, जाणून घ्या संपूर्ण माहिती
खात्यात अचानक पैसे आले? RBIचा मोठा निर्णय; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
Manoj Jarange Patilचा तिसऱ्यांदा अर्ज; मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणार का? मोठी अपडेट समोर
Manoj Jarange Patil मुंबईकडे रवाना; पहिला मुक्काम पाटोदा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
Disha Salian प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेत्याचा राऊतांना पलटवार
साखरेच्या दरात मोठी अपडेट! 4 दिवसांत भाव घसरले, महाराष्ट्रात साखर कितीला?
प्रकृती ठीक नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते कोणाशीही अधिक चर्चा न करता घरात गेले. त्यानंतर त्यांचे वडील भगवान दिपके यांनी तातडीने डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत मोठी माहिती
अभिजीत दिपके यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सकाळपासून त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होत होता. त्यांना दोन ते तीन वेळा उलट्या झाल्या असून, लूज मोशनचाही त्रास झाला.
यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा रक्तदाब थोडा कमी झाला होता. डॉक्टरांनी त्यांना आयव्ही फ्लुइड (IV) देण्यात आले असून, काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की,
“सकाळपासून त्यांना मळमळ, उलटीसारखा त्रास होत होता. दोन-तीन वेळा उलट्या झाल्या आणि लूज मोशन झाले. त्यांचा बीपी थोडा लो झाला होता. त्यांना आयव्ही दिले आहे. संध्याकाळपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जर प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर रक्त तपासणी करण्यात येईल.”
रक्त तपासणी करण्याची शक्यता; रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अभिजीत दिपके यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता कमी आहे. त्यांची रिकव्हरी चांगली होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मात्र, जर त्रास कायम राहिला किंवा प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही तर पुढील तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यामध्ये रक्त तपासणीचा समावेश आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी त्यांच्या आधीच्या आरोग्य स्थितीचाही संदर्भ दिला आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या काळात अभिजीत दिपके यांना टायफाईड झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याने समर्थकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
जंतर मंतर आंदोलनानंतर अभिजीत दिपके चर्चेत
अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) या संघटनेची स्थापना केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या संघटनेला मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रतिसाद मिळाला.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सीजेपीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सीजेपीकडून मोठे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जवळपास एक महिना सुरू होते. त्यानंतर संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणाही करण्यात आली होती.
सीजेपीच्या आंदोलनामुळे अभिजीत दिपके आले होते चर्चेत
नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न यावरून अभिजीत दिपके यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.
जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला होता. त्यावेळी त्यांना टायफाईडची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर सीजेपीचे कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
सध्या डॉक्टरांच्या माहितीनुसार अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर असून, उपचारानंतर त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत.
